Sunday, October 19, 2025
Happy Diwali

यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण विषयक जनजागृतीचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील दिवाळीमध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेचे मापन केले. तसेच दिवाळी दरम्यान ध्वनीची पातळी राज्यातील एकूण १५८ ठिकाणी मोजण्याचे नियोजन केले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाक्यांच्या आवाजाची कमाल तीव्रता १२५ डेसिबल निश्चित केली आहे. दिवाळीआधी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या चाचणीत काही फटाक्यांचा आवाज कमाल मर्यादेपेक्षा कमी तर निवडक फटाक्यांचा आवाज कमाल मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले.

फटाक्यांच्या ध्वनीची मर्यादा कोणत्या भागात किती असावी ?

नागरी वस्ती भागात दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसिबल पर्यंतचा आवाज हा प्रदूषण म्हणून ग्राह्य धरला जातो. तर शांतता क्षेत्र असलेल्या भागात हा आवाज दिवसा ५० आणि रात्री ४० पर्यंत प्रदूषण म्हणून धरला जातो. व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ तर रात्री ५५ आणि औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ तर रात्री ७० डेसिबल ध्वनिमर्यादा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा