Sunday, October 19, 2025
Happy Diwali

सावंतवाडी, रत्नागिरी, संगमेश्वर स्थानकांत रो-रो सेवेला थांबा

सावंतवाडी, रत्नागिरी, संगमेश्वर स्थानकांत रो-रो सेवेला थांबा

रेल्वेतून एकावेळी ४० कारची क्षमता

सिंधुदुर्ग  : मुंबईतून कोकणात पोहोचण्यासाठी रस्तेमार्गे १० ते १३ तासांचा प्रवास करावा लागतो, तर रेल्वेने प्रवास करायचा तरीही तितकाच वेळ लागतो. मुंबई ते कोकण हे अंतर कमी कालावधीत गाठता यावे यासाठी प्रशासनाने रो-रो सेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना ट्रेनमधूनच आपले वाहन घेऊन जाता येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेने या सेवेची घोषणा केली होती. मात्र या सेवेला प्रवाशांचा अल्पप्रतिसाद मिळाला होता.

गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेने कार ऑन ट्रेन सेवा सुरू केली होती. मात्र सेवेला खूपच कमी प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता प्रशासनाने या मार्गावर आणखी तीन स्थानकांचा समावेश केला आहे. कोकण रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून ७,७०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर रोजी कोकण रेल्वेने ३५ वा स्थापना दिन साजरा केला. रो-रो सेवांना अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. मात्र या योजना सुरू झाल्यापासून त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

रो-रो सेवांना अल्प प्रतिसाद मिळाला होता. कोलाड, नांदगाव रोड आणि वेर्णा येथून सात प्रवाशांसह निघाली होती. अतिरिक्त थांबे नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद लाभत नव्हता. विशेषतः रत्नागिरी, सावंतवाडी येथील थांब्यांबाबत प्रश्न होते. त्यामुळे आता या ठिकाणी अतिरिक्त थांबे नियोजित करण्यात आले आहेत. रो-रो ट्रेनमधून चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सावंतवाडी, रत्नागिरी आणि संमगमेश्वर येथे रॅम्प तयार केले जातील, असे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सांगितले. रो-रो ट्रेनमध्ये १० डब्यांचे वॅगन आणि दोन प्रवासी कोच आहेत. रेल्वेतून एकावेळी ४० कार घेऊन जाता येणार आहेत.

Comments
Add Comment