
चड्डा घराण्यात चिमुकल्याचा आगमन झालं आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्डाने दिली गुड न्युज. परिणीती आणि राघव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. परिणितीने १९ ऑक्टोबरला गोंडस बाळाला जन्म दिला आहे. काही वेळेपूर्वीच परिणीतील दवाखान्यात दाखल केलं होत.

परिणीती आणि राघव चड्डाने मुलाला जन्म दिला असून चड्डा घराण्याला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. " या आधीच आयुष्य आम्हाला आठवत नाही , या आधी आम्ही एकमेकांसाठी होतो , आता आमच्याकडे सर्वकाही आहे. असे म्हणत सोशअल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. चाहते आणि सेलिब्रिटींनी कंमेंट्स मध्ये आनंदाचा वर्षाव केला आहे.
परिणीती आणि राघव चड्डा यांनी २०२३ साली लग्न केले होते. २ वर्षांनी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.