Sunday, November 9, 2025

अमेरिकेत ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात 'नो किंग्ज' आंदोलन, हजारो नागरिक रस्त्यावर!

अमेरिकेत ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात 'नो किंग्ज' आंदोलन,  हजारो नागरिक रस्त्यावर!

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाशाहीविरोधात वॉशिंग्टन डीसीपासून ते लंडनपर्यंत हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला 'नो किंग्ज' (No Kings) हे नाव देण्यात आलेय. लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे मायग्रेशन, शिक्षण तसेच सुरक्षा पॉलिसीला विरोध दर्शवला आहे. आयोजकांनुसार अमेरिकेसहित जगभरातून २६०० पेक्षा अधिक नो किंग्स प्रदर्शन होत आहेत. तर लंडन स्थित अमेरिकेच्या दूतावासाबाहेरही लोक शेकडोच्या संख्येने जमले आहेत. आयोजकांचे म्हणणे आहे की त्यांचे हे आंदोलनन ट्रम्प यांच्या धोरणशाहीविरोधात आहे.

लंडनची रॅली, अमेरिका आणि जगभरात आयोजित २६००हून अधिक विरोधक आंदोलनात एकत्र आहेत. या पद्धतीचे आंदोलन स्पेनच्या मॅड्रिड आणि बार्सिलोना येथेही झाले होते. अमेरिकेतली मोठी शहरे, उपनगरे आणि छोट्या भागांमध्येही हजारो लोकांनी निदर्शनात भाग घेतला.

एका रिपोर्टनुसार, वॉशिंग्टन डीसीच्या डाऊनडाऊनमध्ये आंदोलकांनी विविध प्रकारचे पोशाख घातले होते. तसेच त्यांनी हातात बॅनरही घेतले होते. आंदोलक पेनेसेल्वेनिया एव्हेन्यूवर मार्च करत पुढे गेले. आयोजकांनी सांगितले की या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ३०० हून अधिक स्थानिक संघटनांनी सहकार्य केले.

राष्ट्रपतीपद पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतर अवघ्या १० महिन्यांच्या आतच ट्रम्प यांनी मायग्रेशवर कडक निर्बंध लादले. त्यांनी फिलीस्तान समर्थक आंदोलनांमध्ये आणि विविध धोरणांमुळे विश्वविद्यालयांना सांघिक फंडिग रोखण्याचा इशारा दिला. तसेच अनेक राज्यांमध्ये नॅशनल गार्ड तैनात करण्यास मंजुरी दिली. आंदोलकांचे म्हणणे आहे की ट्रम्प प्रशासनाने उचललेले हे पाऊल समाजात विभागणी करत आहे. तसेच लोकशाहीच्या मूळ सिद्धांताला धोका निर्माण करणारे आहे.

Comments
Add Comment