
पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकला आहे. त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याद्वारे बऱ्याच महिन्यांनी भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार आहेत.
कर्णधार म्हणून शुभमन गिलचा हा पहिला वनडे सामना आहे. तर पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्श करत आहे. या सामन्यात भारताकडून नितीश रेड्डीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. त्याचा हा पहिलाच सामना आहे.