Sunday, October 19, 2025
Happy Diwali

माझं कधी काय होईल मला माहित नाही... नाव ठेवणाऱ्यांना स्पष्टच बोलल्या उषा नाडकर्णी

माझं कधी काय होईल मला माहित नाही... नाव ठेवणाऱ्यांना स्पष्टच बोलल्या उषा नाडकर्णी

मुंबई : मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्री मधल्या उषा नाडकर्णी बरेचदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. त्या जितक्या कडक तितक्याच मायाळूही आहेत. इंडस्ट्रीमध्ये त्यांना प्रेमाने आऊ म्हटले जाते. पण काही वेळेस त्यांच्या कडक बोलण्यावरून त्यांच्यावर टीका केली जाते.

'माहेरची साडी' मधील खाष्ट सासूची भूमिका चांगलीच गाजली. ती भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. नुकतेच 'माहेरची साडी' या सिनेमातील कलाकारांचे रियुनियन झाले. यात अलका कुबल, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, आणि किशोरी शहाणे, यांसारखे कलाकार उपस्थित होते. यावेळी उषा नाडकर्णी यांनी मनातील खंत बोलून दाखवली. त्या म्हणाल्या की, 'आता मी मुद्दामच बोलते कारण आता माझं वय झालंय. मी कधी गचकेन सांगता येत नाही. त्यामुळेच मी आधी बोलून घेते. आमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणाबाबत जर चांगलं बोललं गेलं तर तो जो काय जळफळाट होतो त्यांचा.. आणि माझ्याबद्दल बोलताना पण त्या नालायक लोकांना , आता मी नालायकही बोलते का तर मी जर का वाईट असते , मी कोणाला छळलं असत. त्यांना एवढी अक्कल नाही की आज या बाईची पंचाहत्तरी होऊन गेली आहे. तेव्हा काम चालू केलेलं जे ती अजूनही काम करत आहे याचा अर्थ ती कोणालाही त्रास देत नाही.'

'ज्या लोकांना काम नाही ते वाट बघत असतात मला कोण कोणत्या कार्यक्रमांना बोलावेल वगैरे किंवा ते विनंती वगैरे करतात... मला पण बोलवाना... तर मी तसं करत पण नाही. माझा कोणी पीआर नाही, कोणी मॅनेजर नाही, मला हिंदीतही काम मिळतं आणि मराठीतही अजूनही मी काम करते. मी कधीच कोणाला त्रास देत नाही. मास्टरशेफ वेळी मला लताताईंनी फोन केला. मला म्हणाल्या उषा तुझ्यावर किती प्रेम करतात हिंदीवाले, मराठीत असं का करत नाही?. म्हटलं मराठीत काम मिळत नाही मग उगा तिथे का बसायचं ? आणि ती अशी आहे ती तशी आहे असं सांगायचं.'

'एका मुलाखतीत त्या म्हणाल्या आता सुद्धा मी पुण्याच्या एका ज्वेलरकडे जाहिरात केली. ते मला म्हणाले उषा ताई तुम्ही माझ्याकडे काहीच मागत नाही. यावर मी म्हटलं कि मला भीक मागायला माझ्या आईवडिलांनी शिकवलेलं नाही. माझं काम झालं कि मी निघते. पॅकअप म्हटलं की मी थांबतही नाही. मोठ्या माणसांबाबाबत पाठून खूप बोलतात, नरेंद्र मोदींबाबद्दलही माणसं किती बोलतात पण ते काम करतच राहतात ना.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा