गुणसुंदर

जीवनगंध : पूनम राणे


एक शहर होते. त्या शहरात मोठमोठ्या इमारती, दुकानं होती. तेथील परिसर खूप सुंदर होता. त्या शहरात हिना नावाची एक सुंदर स्त्री राहत होती. हिना घरातील सर्व काही पाहायची. सामान आणणे, भाजीपाला आणणे.


एके दिवशी हिनाच्या घरी पाहुणे येणार होते. म्हणून ती बाजारात भाज्या आणायला गेली. मोठ्या पदराची साडी, गळ्यात गंठण, कानात झुमके, पायात हिलवाली चप्पल घालून ती बाजारात गेली. आज खरं म्हणजे त्या शहरातील आठवड्याच्या बाजारचा दिवस होता. हिनाने भरपूर सामान खरेदी केले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने होती. प्रचंड गर्दी झालेली होती. हिना एका हातात दोन-तीन पिशव्यांचं ओझं सावरत चालत होती. चालता चालता तिने बसस्टँडवर उभ्या असलेल्या दोन मुलींना पाहिले.


एक मुलगी रंगाने गोरीपान, छान सलवार सूट घेऊन, मेकअप करून, हातात सोनेरी घड्याळ व पर्स घेऊन ती उभी होती, तिच्याच बाजूला एक रंगाने सावळी, अंगात जीन्स पँट, टीशर्ट, लहान केस, पाठीवर दप्तर, बहुतेक काॅलेजला जात असावी.


हिना चालता चालता गोऱ्या मुलीबद्दल मनातच मनात विचार करू लागली, ‘किती सुंदर मुलगी आहे, तिचे कपडे छान आहेत, वा! मुलगी असावी तर अशी’ मग तिची नजर त्या बाजूच्या सावळ्या मुलीकडे गेली. मनातच बोलू लागली,‘काय मुलगी आहे, जरासुद्धा शिस्त नाही, काय ते कपडे, काळी कुठली.” असे बोलून ती पुढे चालू लागली, चालता चालता टिनाचा तोल जाऊन ती खाली पडली.


गोरी मुलगी तिच्या पडण्यावर जोरजोरात हसून तेथून निघून गेली. हे हिनाने पाहिले, तिला तिचा खूप राग आला, पण दुसरी सावळी मुलगी धावत धावत येऊन हिनाला उठवण्यास मदत करू लागली. तिचे अस्थाव्यस्त पडलले सामान उचलण्यास मदत करू लागली. विचारपूस करू लागली. ती म्हणाली,” ताई, तुम्ही ठीक आहात ना .” मी तुम्हाला तुमच्या घरी सोडायला येते. हिना गालात हसली, त्या सावळ्या मुलीला म्हणाली, “आभारी आहे तुझी.” मी जाईन घरी. हिनाला स्वतःचीच लाज वाटू लागली, ती मनातच हिरमुसली. तिला स्वतःचा राग येऊ लागला. तिला जाणीव झाली, खरंच जगात सुंदर चेहेऱ्यापेक्षा ज्याचे मन सुंदर आहे हे आपणांस ओळखता आले पाहिजे.


तात्पर्य : माणसाच्या रंगावरून, कपड्यांवरून तो कसा असेल याचा विचार न करता गुणांचा विचार करा. माणसाच्या रंगापेक्षा त्याचे गुणच त्याला समाजात मोठा मान मिळवून देतात.

Comments
Add Comment

येता आनंदा उधाण...

प्रासंगिक : अजय पुरकर दीपावलीच्या शुभेच्छा देताना आनंद होतो आहे. सध्या जगण्याचे आयाम बदलले आहेत. माणूस

दिवा आणि दिवाळी...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर मी जयहिंद कॉलेजमधे शिकत असताना घडलेली ही घटना. आमच्या कॉलेजमधे दरवर्षी नवरात्रोत्सव

“एक वो भी दिवाली थी...!”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे दिवाळीच्या आठवणी हा मोठा रम्य विषय असतो, सर्वांसाठीच! ज्यांच्यासाठी आता अनेक

स्वर्ग मंडप असलेले शिल्पकाव्य कोपेश्वर मंदिर

विशेष : लता गुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटावा अशा अनेक शिल्पाकृती आहेत. यादवांच्या कारकिर्दीचा

विनोदी लेखक रमेश मंत्री

कोकण आयकॉन सतीश पाटणकर प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत

नल कुबेर व मणिग्रीव

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे द्वापार युगातील गोष्ट आहे. कुबेराला नल कुबेर व मणिग्रीव नावाची दोन मुले