Sunday, October 19, 2025
Happy Diwali

मुंबईतील रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक

मुंबईतील रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक

मुंबई : राम मंदिर रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. हे बाळ सध्या कूपर रुग्णालयात उपचार घेत आहे. बाळाच्या हृदयात छिद्र असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आईची प्रकृती सुधारत असली तरी बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बाळाच्या चेहऱ्यावरही काही व्यंग असून डॉक्टरांच्या देखरेखेखाली बाळावर उपचार सुरू आहेत.

नेमके काय घडले ?

विरार येथे राहणाऱ्या २४ वर्षीय अंबिका झा यांना लोकलमधून प्रवास करतेवेळी प्रसूती वेदना सुरू झाल्या. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. परिस्थितीचा अंदाज येताच सहप्रवासी अभियंत्या तरुणाने साखळी ओढून गाडी थांबवली आणि महिलेसोबत राम मंदिर रेल्वे स्थानकावर उतरला. यानंतर वैद्यकीय मदत बोलावण्यात आली. पण मदत मिळवण्यास वेळ लागणार होता. महिलेच्या प्रसूती वेदना आणखी तीव्र झाल्या होत्या. अखेर सहप्रवासी अभियंत्या तरुणाने त्याच्या ओळखीतल्या महिला डॉक्टरला व्हिडीओ कॉल केला. या डॉक्टरच्या सल्ल्याने तरुणानेच महिलेची प्रसूती केली. जन्मलेल्या बाळाला मातेसह कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच बाळाची तब्येत बिघडली आहे. बाळाच्या हृदयात छिद्र आहे शिवाय त्याच्या चेहऱ्यामध्ये काही व्यंग आहे. यामुळे बाळाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवणे कठीण आहे. बाळावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा