Sunday, October 19, 2025
Happy Diwali

इशित ट्रोल झाल्यानंतर पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांनी मौन सोडलं, नागपूरच्या स्प्रुहाशी संवाद साधना म्हणाले....

इशित ट्रोल झाल्यानंतर पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांनी मौन सोडलं, नागपूरच्या स्प्रुहाशी संवाद साधना म्हणाले....

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती १७’ या लोकप्रिय शोचा ज्युनिअर वीक सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये सहभागी झालेला 10 वर्षीय इशित भट्ट आपल्या उद्धट आणि आत्मविश्वासू स्वभावामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील नागपूरची स्प्रुहा तुषार शिनखेडे चर्चेचा विषय ठरली आहे. स्प्रुहाशी संवाद साधताना अमिताभ बच्चन यांनी अतिआत्मविश्वासावर एक अनमोल शिकवण दिली, जी प्रेक्षकांच्या मनाला भिडली.

अमिताभ बच्चन म्हणाले, “आपण लहानपणी साप-शिडीचा खेळ खेळलो आहोत. जिंकण्याच्या अगदी जवळ असताना अचानक एक साप येतो आणि आपल्याला परत खाली आणतो. खऱ्या आयुष्यातही तो साप असतो आणि तो म्हणजे ‘अतिआत्मविश्वास’.” त्यांनी पुढे सांगितलं की, “यश, अपयश, एकजुटता, आत्मविश्वास हे सगळे खेळाचे मुळ घटक आहेत. पण अतिआत्मविश्वास हा एकाच क्षणात सर्व काही उद्ध्वस्त करू शकतो.” त्यांनी उदाहरण देताना ससा आणि कासवाची गोष्ट सांगितली “ससा जिंकू शकला नाही कारण तो अतिआत्मविश्वासू होता.”

अमिताभ बच्चन यांच्या या वक्तव्याचा संदर्भ इशित भट्टच्या वादग्रस्त वागणुकीशी जोडला जातो आहे. इशितने शोदरम्यान बिग बींना दिलेली उर्मट उत्तरं प्रेक्षकांना अजिबात रुचली नाहीत. परिणामी, सोशल मीडियावर त्याला आणि त्याच्या पालकांनाही ट्रोल करण्यात आलं. अनेकांनी त्याच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. शेवटी त्याच्या याच अतिआत्मविश्वास आणि उर्मटपणामुळे त्याला रिकाम्या हाताने परतावं लागलं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >