Sunday, October 19, 2025
Happy Diwali

अभिनेत्री काजोलचे कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांना दुखावणारे वक्तव्य, उफाळला नवा नाद

अभिनेत्री काजोलचे कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांना दुखावणारे वक्तव्य, उफाळला नवा नाद
मुंबई : सध्या बॉलीवूडच्या अभिनेत्री त्यांच्या कामाच्या वेळेबद्दल काही ना काही वक्तव्य करत आहेत. सर्वात आधी दीपिका पदुकोणने हा मुद्दा सर्वांसमोर मांडला होता. त्यावर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यातच आता बॉलीवूड अभिनेत्री काजोल हिने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तिच्या "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" या शो च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आलिया आणि वरुण धवन पाहुणे म्हणून आले होते. कार्यक्रमात गप्पा सुरू असताना ९ ते ५ नोकरी करणारे कलाकारांपेक्षा कमी काम करतात असे वादग्रस्त वक्तव्य काजोलने केले. काजोलच्या या विधानामुळे सोशल मीडियावर ती ट्रोल झाली असून यूझर्सने तीव्र शब्दात टीका केली आहे. काजोलने यावर स्पष्टीकरण दिले कि ९ ते ५ नोकरी करणारे कामाच्यामध्ये ब्रेक घेऊ शकतात, थोडा आराम करू शकतात, चहासाठी ब्रेक घेऊ शकतात. मात्र कलाकारांना हे स्वातंत्र्य नसत. शूटिंग दरम्यान त्यांना अंदाजे १२ ते १४ तास त्यांचे १०० टक्के द्यावे लागतात. कलाकारांना येणारी आव्हाने एका मुलाखतीत काजोलने तिच्या कामाचे वर्णन केले होते. ती म्हणाली हे खूप बारकाईने आणि पूर्णपणे लक्ष केंद्रित करुन करायेच काम आहे. जेव्हा तुम्ही शूटिंग करत असता तेव्हा तुम्हाला तुमचे १०० टक्के योगदानवं लागतं. आम्ही द ट्रायल सीझन २ साठी सलग ३५ ते ४० दिवस शूटिंग केले. तुम्हाला व्यायाम करावा लागतो. योग्य तो आहार घ्यावा लागतो. तुमच्या शरीराची देखभाल करावी लागते. कारण तुमच्या शरीरातला थोडासा तरी बदल तुमचा लूक आणि पोशाखावर परिणाम करू शकतो. आणि हे काम खूप दबावाचे आहे. अभिनयाची कॉर्पोरेट नोकरदारांशी तुलना करताना, काजोलने असेही सांगितले की, कलाकारांना ऑफिस कर्मचाऱ्यांप्रमाणे आराम करण्यासाठी वेळ मिळत नाही. जेव्हा तुम्ही ९ ते ५ च्या शिफ्टमध्ये काम करता तेव्हा तुम्ही चहाचा ब्रेक घेऊ शकता. किंवा थोडा आराम करू शकता. आम्ही ते करू शकत नाही. आमच्यावर सतत लक्ष ठेवले जाते. आम्ही कसे बसतो. आम्ही आमचे पाय कसे वाकवतो. आम्ही कसे हसतो किंवा हालचाल करतो. सर्वकाही प्रत्येक क्षणाची तपासणी केली जाते. आम्ही अशा प्रकारे जीवन जगतो. शोमध्ये उपस्थित आलिया भट वरूण धवन आणि ट्विंकलने मात्र काजोलचे म्हणणे अमान्य केले. आलियाने म्हटले कि प्रत्येक जण समान मेहनत करत असतो. आपण त्यांचे काम करत नाही म्हणू आपल्याला समजत नाही पण ९ to ५ शिफ्ट करणारे सुद्धा आपल्या इतकीच मेहनत करत असतात. काजोल "सरजमीन" आणि "मा" मध्ये काम कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास काजोलने २०२५ मध्ये "मा" या हॉरर चित्रपटात काम केले. ती जिओ हॉटस्टार वर प्रदर्शित झालेल्या इब्राहिम अली खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत "सरजामीन" मध्ये देखील दिसली. सध्या काजोल ट्विंकल खन्ना सोबत " टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" हा टॉक शो होस्ट करत आहे. हा शो अमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा