Monday, November 10, 2025

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक मृत्यू असले तरी, अपघात, शिकार , विद्युत प्रवाह व सापळा लाऊन मृत्यू हेही मोठे मृत्यूचे कारण असल्याचे सत्य असून वनविभागासमोर ते मोठे आव्हान ठरत आहे. दरम्यान अपघाताने २३ वाघांचा मृत्यू झाला असून शिकार, विद्युत प्रवाह व सापळा लाऊन २१ वाघांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारातून अधिकृत मिळालेल्या माहितीवरून सदर बाब समोर आली आहे.२०२२ ते २४ सप्टेंबर २०२५ दरम्यान महाराष्ट्रात एकूण ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात १४२ वाघांचे मृत्यू झाले असून त्यात ८४ मृत्यू हे नैसर्गिक आहेत. शिकारी हे प्रामुख्याने त्यांच्या शरीराच्या अवयवांसाठी आणि नखांसाठी वाघांना लक्ष्य करतात, परंतु काही वेळा पशुधनाचे हल्ले रोखण्यासाठी देखील वाघांना मारले जाते, असे अभ्यासक मानतात. २०२२ ते २४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ५३७ बिबट्यांचा मृत्यू झाला असून अपघाताशी संबंधित मृत्यूंची संख्या चिंताजनकपणे १८५ इतकी नोंदविली गेली आहे. ती चिंताजनक मानली जात आहे. २४८ बिबट्यांचे नैसर्गिक मृत्यू झाले आहेत. अकरा बिबट्यांना वीजेचा धक्का बसल्याने,तर आणि आणखी ११ बिबट्यांची शिकार झाली आहे. ७६ बिबट्यांच्या मृत्यूंची चौकशी सुरू आहे वा त्यांना अनिश्चित म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. महाराष्ट्रात वाघ -बिबट्यांचे मृत्यू (२०२२ - २४ सप्टेंबर २०२५) वाघ | बिबटे एकूण मृत्यू: १४२ | एकूण मृत्यू: ५३७ नैसर्गिक: ८४ | नैसर्गिक: २४८ अपघात: २३ | अपघात: १८५ विद्युतप्रवाह / शिकार: २९ | शिकार: २५ अनिश्चित: ६ | अनिश्चित: ७६

Comments
Add Comment