
दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲप दोन्ही अनेक तासांपासून ठप्प झाले होते. त्यामुळे हजारो प्रवाशांचे तिकीट बुकिंग रखडले अनेक अनेकांचे पैसेमध्येच अडकून राहिले. त्यामुळे हजारो यूझर्स चिंतेत पडले. जर तुमचेही पैसे अडकले असतील तर अजिबात घाबरू नका. ते पैसे कसे परत मिळतील त्याची पद्धत जाणून घ्या.
नेमकं झालं काय?
IRCTC ची सेवा ठप्प झाल्यावर युझर्सना लॉगिन करताना 'सर्वर अनअवेलेबल' असा मेसेज दिसत होता. याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर तक्रार देखील केली. वेबसाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म 'डाऊन डिटेक्टर'वरही 5,000 पेक्षा जास्त लोकांनी याची तक्रार नोंदवली होती. मात्र, काही तासांनंतर वेबसाइटवर लॉगइन सुरू झाले. तरीही अजून काही युजर्सना तिकीट बुकिंगमध्ये अडचणी येत आहेत.
सेवा ठप्प होण्याची कारणे काय?
ॲप आणि IRCTC वेबसाइट डाऊन होण्याचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, दिवाळी आणि छठ पूजेच्या काळात लाखो प्रवाशांनी एकाच वेळी 'तत्काळ तिकीट' बुकिंगसाठी लॉगइन करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सर्व्हरवर प्रचंड ताण येऊन ती क्रॅश झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
अडकलेले पैसे 'असे' मिळवा परत
तिकीट बुकिंग करताना तुमचे पेमेंट कट झाले असेल आणि तिकीट बुक झाले नसेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. IRCTC अशा परिस्थितीत पेमेंट ऑटोमॅटिक (Automatic) परत करते.
ऑटोमॅटिक रिफंड: पेमेंट फेल झाल्यास, तुमचे पैसे 3 ते 5 व्यावसायिक दिवसांमध्ये आपोआप तुमच्या बँक खात्यात जमा होतात.
जास्तीत जास्त कालावधी: काही तांत्रिक अडचणींमुळे कधीकधी रिफंड येण्यास 21 दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.
वेळेत रिफंड न मिळाल्यास काय करावे?
निर्धारित वेळेत रिफंड मिळाला नाही, तर तुम्ही IRCTC शी संपर्क साधू शकता. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा:
स्क्रीनशॉट घ्या: ट्रांझेक्शन फेल झाल्यावर त्वरित त्याचा स्क्रीनशॉट घ्या.
ईमेल करा: हा स्क्रीनशॉट संलग्न करून care@irctc.co.in या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवा.
कस्टमर केअर: तुम्ही IRCTC च्या कस्टमर केअर नंबरवरही संपर्क साधू शकता.