मोबाईल गेमची सवय जीवघेणी ठरली, पॉप्युलर गेम खेळताना मुलाचा प्राण गेला

लखनऊ: मोबाईल गेमच्या व्यसनामुळे एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे घडली आहे. मुलगा ‘फ्री फायर’ हा लोकप्रिय मोबाईल गेम खेळत असताना अचानक बेशुद्ध पडला आणि काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मुलांमधील मोबाईल गेमच्या व्यसनावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.


मुलगा बेडवर गेम खेळत होता. काही वेळानंतर तो हालचाल न करत असल्याने कुटुंबीयांना वाटले की तो झोपला आहे. मात्र बराच वेळानंतरही तो न उठल्याने संशय आल्याने पाहिले असता तो मृतावस्थेत आढळला. डॉक्टरांच्या मते हे प्रकरण ‘सडन गेम डेथ’चे असू शकते.



‘सडन गेम डेथ’ म्हणजे काय?


तज्ज्ञांच्या मते, सतत दीर्घकाळ गेम खेळताना शरीरावर आणि मनावर अतिताण येतो. त्यामुळे हृदयाची गती असामान्य होते आणि मेंदूवर दबाव येतो. या तणावामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होऊ शकतो. वैद्यकीय संशोधनानुसार, अनेक तास सलग गेम खेळल्याने झोपेचा अभाव, फुफ्फुसात रक्ताच्या गाठी निर्माण होणे आणि ब्रेन हॅमरेजचा धोका वाढतो.


नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन आणि अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, ही स्थिती ‘इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर’शी संबंधित आहे. १९८२ पासून आतापर्यंत जगभरात अशा २४ घटना नोंदल्या गेल्या आहेत, ज्यात मृतांचा वयोगट ११ ते ४० वर्षांदरम्यान आहे. विशेषतः सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये अशा घटनांचे प्रमाण जास्त आढळले आहे.


या घटनेनंतर पालक आणि तज्ज्ञ दोघेही लहान मुलांच्या गेमिंग सवयींवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करत आहेत. कारण अति गेमिंग आता केवळ व्यसन नसून, जीवघेणा धोका बनला आहे.

Comments
Add Comment

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका