खासदारांची निवासस्थाने असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला भीषण आग

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना घडली. दिल्लीतील संसद भवनापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला आज भीषण आग लागली. डॉ. बिशंबर दास मार्गावर असलेल्या याच ब्रह्मपुत्र आपार्टमेंट्समध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील अनेक खासदारांची निवासस्थाने आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दुपारी १ वाजून २० मिनिटांमी मिळाली. आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असली तरी सुदैवान कुठल्याही जीवितहानीचं वृत्त अद्याप हाती आलेलं नाही.



या घटनेमुळे रहिवशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीमुळे अधिकारी वर्गानेही चिंता व्यक्त केली आहे. ही आग कशी लागली याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्नाची शर्थ करण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची सहा वाहने तैनात करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना 'दे धक्का'

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची

शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख भाजपच्या वाटेवर

डोंबिवली : शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दीपेश म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाची

उबाठाच्या ताब्यातील गड भाजपा करणार काबिज

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या विशेष बैठका आणि सभा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांसोबत पदाधिकाऱ्यांना

प्रचार करणार कधी? इच्छूक उमेदवार संभ्रमात!

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच,

पार्थ पवार प्रकरणात काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना जमीन व्यवहार

अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द!

मुंबई (प्रतिनिधी) : पुण्यातील कोंढवा जमीन अनियमितता प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता हा