Saturday, October 18, 2025
Happy Diwali

खासदारांची निवासस्थाने असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला भीषण आग

खासदारांची निवासस्थाने असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला भीषण आग

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना घडली. दिल्लीतील संसद भवनापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला आज भीषण आग लागली. डॉ. बिशंबर दास मार्गावर असलेल्या याच ब्रह्मपुत्र आपार्टमेंट्समध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील अनेक खासदारांची निवासस्थाने आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दुपारी १ वाजून २० मिनिटांमी मिळाली. आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असली तरी सुदैवान कुठल्याही जीवितहानीचं वृत्त अद्याप हाती आलेलं नाही.

या घटनेमुळे रहिवशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीमुळे अधिकारी वर्गानेही चिंता व्यक्त केली आहे. ही आग कशी लागली याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्नाची शर्थ करण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची सहा वाहने तैनात करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >