Saturday, October 18, 2025
Happy Diwali

परकीय चलनसाठ्यात २.१८ अब्ज डॉलरने घसरण तर सोन्याच्या साठ्यात ३.६ अब्ज डॉलरने वाढ

परकीय चलनसाठ्यात २.१८ अब्ज डॉलरने घसरण तर सोन्याच्या साठ्यात ३.६ अब्ज डॉलरने वाढ

प्रतिनिधी:जागतिक आर्थिक धोरणांचा फायदा किंवा फटका हा कमोडिटी व चलनी बाजारात दिसून येतो. त्याचाच भाग म्हणून यातील समीकरणे वेळोवेळी बदलतात. आर्थिक मागोवा घेत आरबीआयने नवी आकडेवारी जाहीर केली ज्यामध्ये परकीय चलनसाठा (Foreign Exchange Reserves) मोठ्या प्रमाणात घसरला असून सोन्याच्या साठ्यात (Gold Reserves) मध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे. आरबीआयने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, परदेशी चलनसाठा १० ऑक्टोबरपर्यंत २.१८ अब्ज डॉलरने घसर ला असून ६९७.७९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. या आठवड्यात सोन्याच्या साठ्यात ३.६ अब्ज डॉलरने वाढत १०२.३७ अब्ज डॉलरवर वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्यातही परकीय चलनसाठा २७६ अब्ज डॉलरने घसरत ६९९.९६ अब्ज डॉलरवर पोहोचला होता.१० ऑक्टो बरपर्यंत परकीय चलन मालमत्ता (Foreign Currency Assets) ५.६१ अब्ज डॉलरने घसरत ५७२.१० अब्ज डॉलरवर पोहोचले होते असे आरबीआयने अहवालात म्हटले आहे. डॉलरच्या संदर्भात परकीय चलन मालमत्तेत परकीय चलन साठ्यात असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या बिगर-अमेरिकन चलनांच्या मूल्यात वाढ किंवा घसरण यांचा समावेश आहे.आरबीआयने म्हटले आहे की आठव ड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य ३.६ अब्ज डॉलर्सने वाढून १०२.३७ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे.

विशेष रेखांकन हक्क (Special Drawing Rights SDR) १३० दशलक्ष डॉलर्सने कमी होऊन १८.६८ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहेत, असे सर्वोच्च बँकेच्या आकडेवारीत म्हटले आहे.आयएमएफकडे (International Monetary Fund IMF) भारताची राखी व ठेव देखील अहवाल आठवड्यात ३६ दशलक्ष डॉलर्सने कमी होऊन ४.६३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, असे त्यात दिसून आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >