Saturday, October 18, 2025
Happy Diwali

Federal Bank Q2Results: काही क्षणापूर्वी फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात उच्चांकी वाढ निव्वळ नफा १०.८५% वाढला

Federal Bank Q2Results: काही क्षणापूर्वी फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात उच्चांकी वाढ निव्वळ नफा १०.८५% वाढला

मोहित सोमण: फेडरल बँकेने आपला तिमाही निकाल काही क्षणापूर्वी जाहीर केला. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या कालावधीत आपला जबरदस्त निकाल नोंदवला आहे. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात उच्चांकी वाढ (All time High) झाल्याचे बँकेने दिलेल्या आ कडेवारीत म्हटले. बँकेच्या निकालात म्हटल्याप्रमाणे बँकेला २४९५ कोटींचे निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income NII) या तिमाहीत मिळाले. तर बँकेच्या निव्वळ नफ्यात १०.८५% वाढ झाली असून तिमाही बेसिसवर (Quarter on Quarter QoQ) ते ९५५.२६ कोटींवर पोहोचले आहे.बँकेच्या कासा ठेवी (Current Account Saving Account CASA) गुणोत्तरात ९४ बेसिस पूर्णांकाने वाढ झाली असून ते ९५५.२६ कोटींवर पोहोचले आहे. बँकेच्या मते ऑपरेटिंग उत्पन्न व प्रभावीपणे किंमत नियंत्रित केल्याने का सा गुणोत्तर राखण्यात बँकेला यश आले.

आरोए (Return on Assets) १.०९% वर व आरओई (Return on Equity) ११.०१% पोहोचला आहे.बँकेच्या ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर ७.३६% वाढ झाली असून निव्वळ आगाऊ ठेवीत (Net Advances) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ६.२३% वाढ झा ली आहे. बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत (Asset Quality) मध्येही यंदा वाढ झाली असून जीएपीए (Gross Non Performing Assets) १.८३% वर व निव्वळ एनपीएत (Net Non Performing Assets) मध्ये ०.४८% पातळीवर स्थिरावले आहे. बँकेच्या माहितीनु सार, बँकेचा सीआरएआर (Capital to Risk (Weighted) Average Ratio) अर्थात सीएआर (Capital Adequacy Ratio) १५.७१% वर पोहोचला आहे. बँकेने आपली भांडवली स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट केले.

गेल्या वर्षीच्या तिमाहीत बँकेला एकूण ४९९४१८.८३ कोटींचा एकूण व्यवसाय (Total Business) मिळाला होता जो यंदा इयर ऑन इयर बेसिसवर ६.८४% वाढत ५३३५७६.६४ कोटींवर पोहोचला.बँकेच्या ठेवीत गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २६९१०६.५९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ७.३६% वाढ झाल्याने ठेवी २८८९१९.५८ कोटीवर पोहोचल्या आहेत. एकूण उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर ३.७५% वाढ झाली असून ते ७५४१.२३ कोटीवरून ७८२४.३३ कोटीवर पोहोचले आहे. बँकेच्या क्रेडिट ग्रोथमध्येही इयर ऑन इय र बेसिसवर ७.३६% वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २३०३१२.२४ कोटींच्या तुलनेत ते या तिमाहीत २४४६५७.०६ कोटींवर पोहोचले आहे.

निकालावर भाष्य करताना व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हीएस मनियन म्हणाले आहेत की,' या भूमिकेत एक वर्षापेक्षा जास्त काळ घालवल्यानंतर, बँक आज कुठे आहे आणि आपण कोणत्या दिशेने जात आहोत याबद्द ल मला खोलवर खात्री आहे. गेल्या काही तिमाहीत, आम्ही आमचा पाया मजबूत करण्यासाठी आणि भविष्यासाठी बांधकाम करण्यासाठी अनेक धोरणात्मक पुनर्रचना केल्या आहेत आणि त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. आमची CASA फ्रँचायझी सतत आणि अर्थपूर्ण वाढ दाखवत आहे, जी आमच्या ग्राहकांचा विश्वास आणि आमच्या टीमच्या अंमलबजावणीची सातत्य दर्शवते. आम्ही आमच्या मालमत्तेचे मिश्रण विचारपूर्वक वाढवत आहोत, आमच्या मध्यम-उत्पन्न पोर्टफोलिओचा वाटा मोजमाप आणि शिस्तबद्ध पद्धतीने वाढवत आहोत. त्याच वेळी, आमच्या फी उत्पन्नात मजबूत, दुहेरी-अंकी अनुक्रमिक वाढ दिसून आली आहे, जी आमच्या कमाईची रुंदी आणि लवचिकता अधोरेखित करते. आमची मालमत्ता गुणवत्ता मजबूत राहते, विवेकी जोखीम व्यवस्थापन आणि वाढीच्या संतुलित दृष्टिकोनामुळे समर्थित आहे. आपण पुढे पाहत असताना, आपण एक अशी संस्था घडवत आहोत जी तिच्या विचारसरणीत चपळ आहे, तिच्या कृतींमध्ये शिस्तबद्ध आहे आणि फेडरल बँकेला परिभाषित करणाऱ्या स्थिरता आणि मूल्यांमध्ये दृढपणे स्थिर आहे.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >