Bangladesh News : ढाका विमानतळात भीषण आग! विमानतळाचे कार्गो क्षेत्र आगीच्या विळख्यात; धुरामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Hazrat Shahjalal International Airport) भीषण आग लागल्याची घटना आज, शनिवारी (१८ ऑक्टोबर), दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग विमानतळाच्या कार्गो क्षेत्रात लागली. आग इतक्या वेगाने पसरली की, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानतळ प्रशासनाला सर्व उड्डाणे तातडीने थांबवावी लागली. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणत्याही जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. विमानतळावर अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.



बचावकार्यात लष्कराचा सहभाग


इंटर-सर्विसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) नुसार, आग विझवण्यासाठी अनेक सरकारी आणि लष्करी पथके काम करत आहेत: बांगलादेश नागरी विमान वाहतूक प्राधिकरण, बांगलादेश फायर सर्व्हिस, बांगलादेश नौदल, बांगलादेश हवाई दलाचे दोन फायर युनिट्स याशिवाय, बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) च्या दोन प्लाटून देखील बचावकार्यात सहभागी झाल्या आहेत. चटग्राम (Chattogram) येथील शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जनसंपर्क अधिकारी मोहम्मद इब्राहिम खलील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाका विमानतळाचे एअरफील्ड आज सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.



आठ विमानांचे मार्ग बदलले :


ढाका विमानतळ बंद असल्यामुळे, आतापर्यंत एकूण आठ देशांतर्गत (Domestic) आणि आंतरराष्ट्रीय (International) विमानांचे मार्ग बदलून त्यांना चटग्राम विमानतळावर उतरवण्यात आले आहे. यात यूएस-बांगला एअरलाइन्सची दोन आणि बांगलादेश एअरलाइन्सची दोन अशा चार आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश आहे. यामुळे चटग्राम विमानतळावर उतरलेल्या विमानांची एकूण संख्या आठ झाली आहे. विमानतळ अधिकारी म्हणाले की, ढाका विमानतळावरील परिस्थिती पूर्ववत झाल्यावर मार्ग बदललेली ही सर्व विमाने पुन्हा ढाका येथे परततील. दरम्यान, ढाका विमानतळावर सर्व उड्डाणे थांबवण्यात आल्यामुळे परदेशात जाण्यासाठी निघालेले सर्व प्रवासी हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरच प्रतीक्षा करत आहेत, ज्यामुळे तेथे मोठी गर्दी झाली आहे.

Comments
Add Comment

चीनची मोठी झेप! ऑनर आणणार जगातील पहिला AI Robot Phone, जाणून घ्या खास फीचर्स

बीजिंग – तंत्रज्ञानाच्या विश्वात मोठा बदल घडवणारी बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सम्राट राणाला सुवर्णपदक

कैरो : कर्नालचा युवा नेमबाज सम्राट राणा याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. सोमवारी,

Blast in Pakistan : इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट! हायकोर्टाजवळ कार ब्लास्ट, आत्मघातकी कार स्फोटात अनेकांचे बळी

इस्लामाबाद : भारताची राजधानी दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटानंतर आता पाकिस्तानच्या राजधानीतही (Islamabad) आत्मघातकी

मोदींचा भूतान दौरा, द्विपक्षीय संबंधांना मिळणार नवी चालना

भूतान : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध

इस्लामाबादमध्ये स्फोट! अपघात की घातपात?

इस्लामाबाद: इस्लामाबाद न्यायालयाबाहेर आज दुपारी १२:३० च्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. ज्यात सहा जणांचा मृत्यू

दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्तानला धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक

इस्लामाबाद : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने देशभरात खळबळ माजली आहे.