Friday, October 17, 2025
Happy Diwali

Stock Market Opening Bell: आयटी शेअर्सच्या घसरणीसह शेअर बाजारात सन्नाटा सेन्सेक्स निफ्टीत सकाळच्या सत्रात घसरण

Stock Market Opening Bell: आयटी शेअर्सच्या घसरणीसह शेअर बाजारात सन्नाटा सेन्सेक्स निफ्टीत सकाळच्या सत्रात घसरण

मोहित सोमण: गिफ्ट निफ्टी घसरण्यासह कमकुवत जागतिक संकेतामुळे आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. बाजाराच्या सुरूवातीला सेन्सेक्स ९४.३२ अंकाने व निफ्टी ७.२५ अंकांने घसरला आहे. बँक निर्देशांकासह मिड स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरणीचे संकेत स्पष्ट होताना क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ ऑटो (०.४८%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.३८%) निर्देशांकात झालेल्या वाढीमुळे निर्देशांकातील घसरण मर्यादित राहिली असून आयटी (१.१६%), मिडिया (०. ८४%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (०.८६%) निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे बाजाराला फटका बसलेला दिसत आहे. व्यापक निर्देशांकात मिडकॅप ५० (०.२२%), मिडकॅप १०० (०.२०%) निर्देशांकात घसरण झाली.

दोन दिवसांच्या बाजारातील रॅलीनंतर आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. प्रामुख्याने काल आयटी व इतर कंपन्यांच्या साधारण तिमाही निकालानंतर क्षेत्रीय विशेष समभागात त्याचा परिणाम जाणवत असून शेअर बाजारात नवा ट्रिगर नसल्यामुळे बाजारात वाढी चे संकेत मिळत नाही. याशिवाय कालच्या कमोडिटी बाजारातील थंडावलेल्या प्रतिसादानंतर आज मात्र पुन्हा एकदा सोने व तेलाच्या निर्देशांकात वाढीसह आज दोन्ही कमोडिटीत दबाव कायम राहू शकतो. प्रामुख्याने भारत युएसची कच्च्या तेलाच्या वक्तव्याला प्र तिसाद देऊन रशियाकडूनच तेल खरेदी करण्याचे संकेत दिल्याने बाजारात तेलाच्या निर्देशांकात आणखी वाढ होऊ शकते. दुसरीकडे जागतिक स्तरावर काल युएस शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने आज पडझड कायम राहू शकते. दरम्यान आशियाई बा जारातील सुरूवातीच्या कलात मोठी घसरण झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ गोदावरी पॉवर (५.०२%), फोर्स मोटर्स (३.४१%), अदानी पॉवर (३.२०%), एचबीएल इंजिनिअरिंग (३.१७%), एशियन पेटंस (३.०३%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३%), रेडिको खैतान (२.४१%), आनंद राठी वेल्थ (२.३१%), लेमन ट्री हॉ टेल (१.८६%) समभागात झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण विप्रो (४.६३%), जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चर (३.१७%), वेलस्पून लिविंग (३.०२%), स्विगी (२.५०%), कोफोर्ज (२.४८%), झी एंटरटेनमेंट (२.३५%), इटर्नल (२.३७%), टाटा कम्युनिकेशन (२.९१%), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.७८ %), इन्फोसिस (१.६५%), आलोक इंडस्ट्रीज (१.५६%), इंडियन बँक (१.२२%), टेक महिंद्रा (१.२१%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (१.२१%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment