धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला शेअर बाजारात 'दिवाळी' सकाळी घसरलेला सेन्सेक्स व निफ्टी एफएमसीजी शेअरसह 'हिरव्या' रंगात बंद !

मोहित सोमण:दिवाळीच्या शुभसंकेतासह बाजारातील जबरदस्त सकारात्मकतेमुळे शेअर बाजारात आज वाढ झाली आहे. अखेरच्या सत्रात गुंतवणूकदारांनी राखलेल्या खरेदीसह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढवल्यामुळे आज इक्विटी बेंचमा र्क निर्देशांकात वाढ झाली. सेन्सेक्स ४८४.५३ अंकाने उसळत ८३९५२.१९ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी १२४.५५ अंकांने उसळत २५७०९ पातळीवर स्थिरावला आहे. आज विशेषतः सकाळच्या घसरणीतील संकेतानंतर बँक निफ्टीने ५७६३१.५० या विक्र मी पातळी गाठल्याने गुंतवणूकदारांनी बँक समभागात (Stocks) मोठा प्रतिसाद दिल्याने शेअर बाजारात रॅली होण्यास मदत झाली आहे. याशिवाय क्षेत्रीय निर्देशांकातील एफएमसीजी (१.३७%), फार्मा (०.६८%), हेल्थकेअर (०.७६%),ऑटो (०.६६%) या शेअर्स मध्ये झालेल्या वाढीमुळे बाजाराथ तेजी मिळवण्यास मदत झाली. दरम्यान मिडिया (१.५६%), आयटी (१.६३%), पीएसयु बँक (०.६५%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (१.१८%) समभागात घसरण कायम राहिली.


कालच्या संमिश्र जागतिक कौलानंतर आजही संमिश्रित कल अखेरच्या सत्रात जागतिक स्तरावर सुरु होता. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही बाजारात घसरण सुरू असून आशियाई बाजारातील बहुतांश निर्देशांकात घसरण कायम आहे. निकेयी २२५ (१.५२%), तैवान वेटेड (१.२७%), जकार्ता कंपोझिट (२.६४%), शांघाई कंपोझिट (१.९९%) निर्देशांकात झाली आहे. जागतिक अस्थिरतेत सोन्या चांदीच्या जागतिक पातळीवरील गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कमोडिटी दरपातळी महागली होती. क च्च्या तेलाच्या किमतीत मात्र घसरलेल्या मागणीमुळे घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत मात्र आज रूपयात २१ पैशाने वाढ झाली असल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूक दारांनी आपली गुंतवणूक कायम राखली. भारतीय गुंतवणूकदारांनी आगामी तिमाही नि कालादरम्यान सावधगिरी बाळगली आहे.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ वर्लपूल इंडिया (११.८४%),बॉम्बे बुरमाह (५.९३%), फोर्स मोटर्स (५.६७%), अदानी पॉवर (५.४७%), एसबीएफसी फायनान्स (४.५६%), एशियन पेटंस (४.०७%), भारती हेक्साकॉम (३.७६%), रेडिको खैतान (३.६९%), पी जी इलेक्ट्रोप्लास्ट (३.४१%), असाही इंडियन ग्लास (३.०२%), गोदावरी पॉवर (२.७८%), डेटा पँटर्न (२.७५%), इमामी (२.३३%) समभागात झाली आहे.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण क्रेडिट एसीसी (७.४३%), जिंदाल (५.२९%), विप्रो (५.०९%), पीसीबीएल केमिकल्स (४.४५%), वेलस्पून लिविंग (४.२६%), जीएमडीसी (३.९९%), जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चर (३.८०%), येस बँक (३.७६%), झी एंटरटेनमेंट (३.६६%), रामकृष्ण फोर्ज (३.१४%), सारडा एनर्जी (३%), नुवामा वेल्थ (२.८४%), उषा मार्टिन (२.७८%), सेंट्रल बँक (२.६१%), पीबी फिनटेक (२.६१%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

CSMT परिसरात सापडलेल्या त्या बॅगेत नेमकं काय सापडलं ?

मुंबई : देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिक ताणलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा संशयास्पद

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा