
मोहित सोमण:आज अखेर मिडवेस्ट लिमिटेड आयपीओची मुदत संपली आहे. शेवटच्या दिवशी कंपनीच्या आयपीओला एकूण ९१.९० पटीने दणदणीत सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण सबस्क्रिप्शनपैकी २४.७७ पटीने सबस्क्रिप्शन किरकोळ गुंतवणूकदारांक डून मिळाले असून १४६.९९ पटीने सबस्क्रिप्शन पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून, १७६.२० पटीने सबस्क्रिप्शन विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मिळाले आहे. त्यामुळे ४५१ कोटींच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एकूण ०.२३ कोटी शेअर (२५० कोटी) बाजारात फ्रेश इशू मार्फत विक्रीसाठी उपलब्ध होते तर ऑफर फॉर सेल (OFS) ०.१९ कोटी शेअर उपलब्ध होते. २४ ऑक्टोबरला हा आयपीओ बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. १०१४ ते १०६५ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित कर ण्यात आली आहे.
पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) २० ऑक्टोबरला होऊ शकते. आयपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४९१० शेअरची खरेदी अनिवार्य करण्यात आली होती. कंपनीकडून एकूण ४२३४७४० शेअर विक्रीसाठी उपलब्ध होते. त्या पैकी २३४७४१७ शेअर फ्रेश इशू असून उर्वरित १८८७३२३ शेअर ऑफर फॉर सेल अंतर्गत उपलब्ध होते. मिडवेस्ट कंपनी १९८१ साली स्थापन झाली होती. कंपनी नैसर्गिक दगडांचे अन्वेषण, खाणकाम, प्रक्रिया, विपणन, वितरण आणि निर्यात या व्यवसायात गुंत लेली आहे. कंपनी ब्लॅक गॅलेक्सी ग्रॅनाइटची उत्पादक आणि निर्यातदार आहे, जी तिच्या चमकदार सोनेरी फ्लेक्ससाठी ओळखली जाणारी एक प्रसिद्ध ग्रॅनाइट जाती आहे.
कंपनीकडे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये एक ग्रॅनाइट प्रक्रिया सुविधा आहे, ज्यामुळे ग्रॅनाइट उत्पादनांचे मोठ्या प्रमाणात प्रक्रिया आणि परिष्करण शक्य होते. कार्यरत खाणींव्यतिरिक्त, मिडवेस्ट लिमिटेडने भविष्यातील खाणकामांसाठी आंध्र प्र देश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये २५ ठिकाणी एक मजबूत संसाधन बेस निर्माण केला आहे.
मिडवेस्ट लिमिटेडने एक मजबूत जागतिक उपस्थिती स्थापित केली आहे, चीन, इटली आणि थायलंड हे प्रमुख निर्यात बाजार असलेल्या पाच खंडांमधील १७ देशांमध्ये कंपनीने त्यांची उत्पादने निर्यात केली आहेत. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ३३% अधिक करोत्तर नफा (PAT) मिळाला होता. तर कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ७% वाढ प्राप्त झाली होती. कंपनीच्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requirements), भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure), प्री पेमेंट, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.