Monday, October 20, 2025
Happy Diwali

हास्यजत्रा फेम अभिनेत्याचं गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवाहन, जिंकलं चाहत्यांचं मन

हास्यजत्रा फेम अभिनेत्याचं गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवाहन, जिंकलं चाहत्यांचं मन

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार काही ना काही कारणास्तव चर्चेत असतोच. आणि प्रत्येकाचा चाहता वर्ग ही तितकाच मोठा आहे, त्यातील एका कलाकाराविषयी आपण बोलतोय आणि तो पृथ्वीक प्रताप , अभिनयासोबत सामाजिक कार्यातही सक्रिय असतो. पृथ्वीक हा अनेक एनजीओशी जोडलेला आहे. गरजू मुलाना मदत करत असतो.

नुकतंच एका मुलाखतीत त्याने विद्यार्थ्यांना एक आवाहन केलं. आणि प्रेक्षकांचं मनं जिंकून घेतलं.

पृथ्वीक प्रतापने नुकतीच MHJ PODCAST ला एक मुलाखत दिली त्यात त्याने एक आवहन केले की 'मी या पॉडकास्ट मधून सांगू इच्छितो कि ज्यांना कोणाला वाटतंय की मला शिक्षण घ्यायचं आहे पण काही परिस्तिथीमुळे ते शक्य होत नाहीये तर अश्या विद्यार्थ्यांनी मला जरूर हक्काने कॉन्टॅक्ट करावा.... मला काहीच प्रॉब्लेम नाहीये.

शिक्षणासाठी काम का करायचं ठरवलसं असा प्रश्न विचारला असता पृथ्वीक म्हणाला ' माझे बाबा गेल्यानंतर माझ्या मामाने मला, आई आणि दादाला मुंबईत आणलं. माझ्या वडिलांना मामाने वचन दिल होत की , तुमच्या मुलाचं शिक्षण, संगोपन मी करेन.. आई मला नेहमी सांगायची हा तुझा बाप नाहीये, मामा आहे. त्यामुळे या तुझ्यासाठी जे करतोय ते गोड़ मानायचं. तुला जे मिळेल ते घ्यायचं. शिक्षणाचं महत्व मला मी पासआऊट झाल्यानंतर समजलं. आणि माझ्या लक्षातही आली की माझ्या हातात डिग्री आहे ती अश्या माणसामुळे जो दहावीसुद्धा पास नाहीये. माझ्या मामाने खूप हट्टाने आम्हाला शिकवलं . जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही असं माझा मामा म्हणायचा' आणि ते मी कायम लक्षात ठेवलं . म्हणून मी आज या ठिकाणी आहे की मी सुद्धा इतर मुलांना शिक्षणासाठी मदत करू शकतो.

कॉलेज पासआऊट झाल्यानंतर माझ्या मामाच्या डोळ्यात पाणी बघितलं, त्याने वडिलांना दिलेला शब्द पूर्ण केला. आणि तेव्हाच मला जाणवलं की कोणाचं तरी शिक्षण पूर्ण करणं, कोणाला तरी शिक्षणासाठी मदत करणं, किती गरजेचं आहे. ज्या माणसाला मी मदत करेन कदाचित त्याला सुद्धा उद्या वाटेल की या माणसामुळे माझं शिक्षण झालंय उद्या मी आणखी दोघांना शिक्षणासाठी मदत करतो. शिक्षणामुळे तुम्हाला समजत वावरण्याचा आत्मविश्वास मिळतो.असं पृथ्वीक म्हणाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा