
प्रतिनिधी: जिओ फायनांशियल सर्विसेसने डिजिटल गोल्डसाठी एक धमाकेदार योजना (Scheme) गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. आता गुंतवणूकदार जिओ फायनांशियल सर्विसेस लिमिटेड (JFSL) कडून १० रूपयात डिजिटल सोने खरेदी करू शकाल. ही योजना खरेदी करण्या ऱ्या खरेदीधारकांना २% अतिरिक्त डिजिटल सोने गुंतवणूकीवर मिळणार आहे. तसेच पात्र गुंतवणूकदारांना १० लाखांपर्यंतची बक्षिसे मिळू शकतात. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू झाली असून धनत्रयोदशी व दिवाळी दरम्यान खरे दी करण्याऱ्या गुंतवणूकदारांना हा लाभ होऊ शकतो. मात्र २००० रुपयांपासून खरेदी करत असलेल्या ग्राहकांना संबंधित ऑफर लागू असेल असे कंपनीने आपल्या संकेतस्थळावर स्पष्ट केले आहे. १८ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर कालावधीत जिओ फायनान्स अँ पवर खरेदी केल्यास हा लाभ होईल.
जिओ गोल्ड मेगा बक्षीसे जिंकण्यासाठी २०००० पेक्षा अधिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या योजेतून संभाव्य बक्षीस मिळवू शकणार आहेत. पात्र गुंतवणूकदारांना स्मार्टफोन, टीव्ही, मिक्सर, सोन्याची नाणी, इतर गिफ्ट मिळतील. या डिजिटल सोने योज नेत प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करण्याची गरज नाही. हे डिजिटल सोने खरेदी केल्यास डिजिटली ते स्टोर होणार आहे. माहितीनुसार, ही ऑफर जाहीर होत असताना सोन्याचा दर २४ कॅरेटमागे १३१९५० रूपयांवर पोहोचला आहे.