Friday, October 17, 2025

SEBI News: कमोडिटी बाजारात संस्थात्मक गुंतवणूकदारांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू

SEBI News: कमोडिटी बाजारात संस्थात्मक गुंतवणूकदारांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू

सेबी अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांचे वक्तव्य

प्रतिनिधी:मार्केट नियामक सेबीने कमोडिटी बाजारात नवे फेरबदल करायचे ठरवले आहे. यासाठी कमोडिटी बाजारातील शेती व बिना शेती कमोडिटीत इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज गुंतवणूकदारांना परवानगी देण्याचा विचार सेबी करत असल्याचे सेबीने स्पष्ट केले. सेबी अध्यक्ष तुहीन कांता पांडे हे ब्लूमबर्ग फोरम फॉर इन्व्हेसमेंट मॅनेजमेंट या कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले आहे. 'हेजिंगसाठी आम्ही संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहोत यावर विचारमंथन सुरू आहे.' असे त्यांनी बोलताना म्हटले. ते असेही म्हणाले आहेत की की, 'आमच्या रोख शेअर बाजाराचे सखोलीकरण करणे आणि डेरिव्हेटिव्ह्ज बाजार सुधारणे ही आमच्यासाठी उच्च प्राथमिकता आहे'. शिवाय या बाजारपेठांमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील उपाययोजना प्र स्तावित करताना नियामक विचारशील आणि सल्लागार असेल.

गेल्या महिन्यात, पांडे यांनी सांगितले होते की सेबी बँका, विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांना गैर-कृषी कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यासाठी सरकारशी सहभागी होईल. त्यांनी सांगितले होते की भांडवली बाजार (Capital Market) नियामक परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना नॉन-कॅश सेटलमेंट, नॉन-कृषी कमोडिटी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टमध्ये व्यापार करण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावावर देखील विचार करत आहे. तसेच पांडे म्हणाले की ही की नियामकाने कॉर्पोरेट बाँड मार्केट अधिक खोलवर नेण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत, ज्यामुळे ते जारीकर्ते आणि गुंतवणूकदार दोघांसाठीही अधिक सुलभ होईल.नियामक या विभागाला बळकट करण्यासाठी आणखी एक उपक्रम म्हणून बाँड डेरिव्हेटिव्ह्जची तपासणी करत आहे अ से ते म्हणाले.

याव्यतिरिक्त, नियामक सुधारणा आणि आउटरीच कार्यक्रमांद्वारे महानगरपालिका बाँडच्या वाढीस प्रोत्साहन दिले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >