Friday, October 17, 2025
Happy Diwali

रास्तभाव धान्य दुकानातून धान्य उचला

रास्तभाव धान्य दुकानातून धान्य उचला

२० तारखेपर्यंत घेण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

अलिबाग : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रास्तभाव धान्य दुकानातून धान्य वाटप करण्यात येते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत रास्त भाव धान्य दुकानातून धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी केले आहे.

या कालावधीत ई-केवायसी न केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांचे दुकानदाराने मशीनवर अंगठा घेऊन ई-केवायसीचे काम पूर्ण करुन घ्यावे, याबाबत कोणतीही कुचराई करुन नये. ही लाभार्थ्यांना शेवटची संधी असून, ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात येणार आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल, त्यांनी दुकानदाराकडे धान्य घेताना ई-केवायसी करुन घ्यावी, तसेच पात्र लाभार्थ्यांनी महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत दुकानातून धान्याची उचल करावी. त्यासाठी सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांनी या कालावधीत दुकाने सुरु ठेवून लाभार्थ्यांना १०० टक्के धान्याचे वाटप करावे.

Comments
Add Comment