Friday, October 17, 2025

दिवाळीच्या पूर्वसंध्येला बँक निफ्टी ५२ आठवड्यातील ५७६५१.३० सर्वोच्च शिखरावर निफ्टी २५७०० पार 'या' कारणांमुळे

दिवाळीच्या पूर्वसंध्येला बँक निफ्टी ५२ आठवड्यातील ५७६५१.३० सर्वोच्च शिखरावर निफ्टी २५७०० पार 'या' कारणांमुळे

मोहित सोमण: बँक निफ्टी निर्देशांक आज रेकोर्ड ब्रेक पातळीवर पोहोचला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेअर बाजारातील फंडामेंटल तेजीचा सर्वाधिक फायदा बँक निफ्टीत होताना दिसला आहे. आज बँक निफ्टीची पातळी ५२ आठवड्यातील सर्वाधिक ५७ ६५१.३० पातळीवर पोहोचली होती. तर निफ्टीनेही आठवड्यातील सर्वाधिक २५७०० पातळी गाठली होती. विशेषतः नुकत्याच जाहीर झालेल्या बँकिग तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार गुंतवणूकदारांनी बँकिंग शेअरला वाढता पाठिंबा दिला आहे.

प्रामुख्याने शेअर बाजारातील खाजगी बँकात घरगुती गुंतवणूकदारांसह संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक वाढल्याने बँक निर्देशांकात मोठी तेजी दिसली. यापूर्वी आरबीआयने रेपो दर जैसे थे ठेवल्यानंतर बँकिंग वित्तीय सेवेच्या शेअर्समध्ये तेजी दिसली हो ती. त्यानंतर काही काळातील घसरणीनंतर या आठवड्यात सणासुदीच्या काळासह तिमाही निकालावर विशेष तेजी दिसली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये संपूर्ण वर्षात बँक निर्देशांकाने सुमारे १३% वाढ दर्शविली आहे. ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनं तर बँक निफ्टी ६००००-६२५०० पातळीवर पोहोचू शकतो. निफ्टीच्या बाबतीत निफ्टीने आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक स्तर (All time High) गाठला आहे. निफ्टीने आज २५७०० पातळी गाठली आहे. मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात निफ्टीने २६२७७ पात ळी (All time High) गाठली होती.

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर वित्तीय सेवा खरेदी करण्याचा ग्राहकांचा भरणा असतो. याशिवाय रेपो दर स्थिर राहिल्याने बाजारातील तरलता वाढत आहे. लोकांकडून जीएसटी कपातीमुळे मोठ्या प्रमाणात खरेदी वाढल्याने बाजारातील उपभोग वाढत आहे.वाढलेल्या खेळत्या पैशासह बाजारात गुंतवणूक वाढत आहे तसेच कर्ज पुरवठ्यातही रेपो दरातील लवचिकतेमुळे वाढ झाली आहे. या कारणामुळे बँक निर्देशांकात विशेषतः खाजगी बँकेच्या अतिरिक्त वाढीमुळे बँक निफ्टीत व निफ्टीत वाढ झाली होती.

निफ्टी बँकेतील ऐतिहासिक तेजी अनेक घटकांवर अवलंबून आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार खाजगी बँकांमध्ये पुन्हा गुंतवणूक विशेषतः या आठवड्यात वाढवत आहेत तसेच तज्ञांच्या मते,एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या तिमाही निकालांच्या अपेक्षेने भाव उंचावला आहे. निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) मध्ये सुधारणा आणि एसबीआयसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये मजबूत मूलभूत घटकांमुळेही तेजीला पाठिंबा मिळाला आहे. याव्यतिरिक्त, खाजगी कर्जदारांनी केलेल्या तरतुदी मंजूर के ल्याने या क्षेत्रातील संस्थात्मक विश्वास वाढला आहे ज्यामुळे बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकीत वाढ होताना दिसते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >