Friday, October 17, 2025
Happy Diwali

अभिनेता जॅकी श्रॉफ 'थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र' अभियानाचे सदिच्छादूत!

अभिनेता जॅकी श्रॉफ 'थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र' अभियानाचे सदिच्छादूत!

मुंबई: ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान, जॅकी श्रॉफ यांनी थॅलेसिमिया या रक्ताच्या अनुवंशिक आजाराबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला सक्रिय सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.

जॅकी श्रॉफ हे गेल्या काही वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून थॅलेसेमिया विषयावर सातत्याने कार्यरत आहेत आणि या आजाराविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या भेटीदरम्यान सांगितले की, थॅलेसिमियासारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी, सेवाभावी संस्था, प्रतिष्ठित नागरिक आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे आणि या आजाराविषयी सामान्य लोकांमध्ये अधिक व्यापक जनजागृती व्हावी, अशी शासनाची अपेक्षा आहे.

या भेटीत ‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ या राज्य शासनाच्या अभियानासाठी अभिनेते जॅकी श्रॉफ यांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्याबाबत अनौपचारिक चर्चा झाली. यावेळी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम पुरी, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment