Thursday, October 16, 2025

'UP पॅटर्न'चा धसका! नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'बुलडोझर ॲक्शन'ची जोरदार चर्चा

'UP पॅटर्न'चा धसका! नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'बुलडोझर ॲक्शन'ची जोरदार चर्चा

अवैध बांधकामे, गुन्हेगारी अड्डे जमीनदोस्त; "गुन्हेगारांना माफी नाही, कायदा सर्वांसाठी समान" – मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'UP पॅटर्न'वरील कारवाईमुळे नाशिक जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार, नाशिक पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे, ज्यामुळे शहरात 'बुलडोझर ॲक्शन'ला वेग आला आहे.

शहरातील विविध भागांमध्ये अवैध बांधकामे, गुन्हेगारी अड्डे आणि समाजविघातक प्रवृत्तींवर छापेमारी करून अनेक ठिकाणी बुलडोझर चालवून बेकायदेशीर रचना जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. या कठोर कारवाईमुळे नाशिकमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असून, सामान्य नागरिकांमध्ये दिलासा आणि विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट विधान

"गुन्हेगारांना माफी नाही, कायदा सर्वांसाठी समान आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य दृढ करण्यासाठी 'UP पॅटर्न'वर कारवाई सुरू केली आहे. नागरिकांना सुरक्षा आणि गुन्हेगारांना शिक्षा — हाच सरकारचा निर्धार आहे."

नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे मत

"शहरात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे हा पोलिसांचा प्रमुख उद्देश आहे. अवैध बांधकामे, गुन्हेगारी टोळ्या आणि मोकाट प्रवृत्तींच्या विरोधात आमची कारवाई पुढेही सुरू राहील."

नाशिक पोलीस आयुक्तालयाने ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी विशेष पथके तयार केली असून, संवेदनशील भागांवर कडक नियंत्रण ठेवले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन २४ तास कार्यरत आहे.

शहरात सुरू झालेल्या या 'बुलडोझर अ‍ॅक्शनमुळे' 'UP पॅटर्न'ची चर्चा आता महाराष्ट्रभर रंगली आहे आणि नागरिकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कठोर भूमिकेचे स्वागत केले आहे. नाशिक जिल्हा खऱ्या अर्थाने “कायद्याचा बालेकिल्ला” ठरत आहे. पोलीस प्रशासनाची ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असून, कायद्याचे राज्य दृढ करण्यासाठी प्रयत्न अधिक गतीने सुरू राहतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >