Tuesday, December 23, 2025

सेलिब्रिटी असलेल्या दोन बहिणी, एक साऊथची आणि दुसरी बॉलिवूडची अभिनेत्री; पण..

सेलिब्रिटी असलेल्या दोन बहिणी, एक साऊथची आणि दुसरी बॉलिवूडची अभिनेत्री; पण..

मुंबई : बॉलीवुड इंडस्ट्री असो की साऊथ इंडस्ट्री या दोन्ही मध्ये कौटुंबिक संबंध आपल्याला नेहमीच दिसून आले आहेत. असाच काहीसा कौटुंबिक संबंध आहे डर्टी पिक्चर मधली विद्या बालन आणि फॅमिली मॅन सिरिज मधली अॅक्ट्रेस प्रियमाणि यांचा

विद्या बालन आणि प्रियमाणि या नात्याने चुलत बहिणी आहेत. म्हणजेच त्यांचे आजोबा हे दोघे भाऊ होते . परंतु दोन्ही परिवाराचे आपापसात पटत नसल्याने कुटुंब विभक्त झाले.

एक मुलाखतीत प्रियमाणि हिने सांगितले होते की आमचं दोघींचं कधीच बोलण होत नाही. पण विद्या बालनच्या बाबांशी म्हणजेच माझ्या काकांशी माझे बोलणे होते. शिवाय आमच्या दोघींचे बाबा ही एकमेकांशी बोलतात.

विद्या बालन संदर्भात काय म्हणाली प्रियमाणि

विद्या बालन ही खूप सुंदर आणि माझी आवडती अभिनेत्री आहे. आम्हा दोघींना एकमेकींचे कायम कौतुकच आहे. एकमेकांप्रती आदर आहे. विद्याचा COMEBACK व्हावा अशी एक तिची चाहती म्हणून माझी प्रचंड ईच्छा आहे.

प्रियमाणि ने शाहरुख खान सोबत जवान चित्रपटात काम केले होते. लवकरच ती मनोज वाजपेयी सोबत द फॅमिली मॅन सिझन ३ या सीरिजमध्ये दिसून येणार आहे

Comments
Add Comment