Thursday, October 16, 2025

Stocks: इटर्नल शेअर नव्या उच्चांकावर तर ॲक्सिस बँकेचा शेअर जबरदस्त उसळला

Stocks: इटर्नल शेअर नव्या उच्चांकावर तर ॲक्सिस बँकेचा शेअर जबरदस्त उसळला

मोहित सोमण:इटर्नल (Zomato), अँक्सिस बँक कंपनीच्या शेअर्सने आज जोरदार उसळी घेतली आहे. विशेषतः आगामी तिमाही निकाल जाहीर होण्यापूर्वीच कंपनीचा शेअर १.५०% उसळला असून काल प्रदर्शित झालेल्या अँक्सिस बँकेच्या चांगल्या तिमाही कामगिरीमुळे कंपनीचा शेअर २.०३% उसळला आहे. सकाळी ११.०२ वाजता इटर्नल शेअर ३६० रूपयांवर पोहोचला असून अँक्सिस बँकेचा शेअर ११९५ रूपयांवर पोहोचला होता. सत्राच्या सुरुवातीलाच इटर्नल शेअर २% हून अधिक पातळीवर उसळला असून अँक्सिस बँकेचा शेअर ४% हून अधिक पातळीवर उसळला होता.

बाजार तज्ञांच्या मते, इटर्नल कंपनीच्या निव्वळ नफ्यात घसरण अपेक्षित आहे. मात्र तरीही यावेळी संमिश्र प्रतिक्रिया आल्यानंतरही गुंतवणूकदारांनी शेअरवर विश्वास व्यक्त करत रॅली करण्यास मदत केली. तर दुसरीकडे अँक्सिस बँकेच्या शेअरला मोठ्या प्रमाणा त खरेदी वाढल्याने मागणी प्राप्त झाली.काल ॲक्सिस बँकेने आपला तिमाही निकाल जाहीर केला होता. बँकेच्या कामगिरीत सुधारणा होण्यासह असेट क्वालिटीत सुधारणा झाल्याने हा प्रतिसाद आज शेअर बाजारात मिळाला. बँकेला इयर ऑन इयर बेसिसवर नि व्वळ नफ्यात वाढलेल्या प्रोव्हिजनींगमुळे २६% घसरण झाली होती. मात्र बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात २%, निव्वळ व्याज मार्जिनमध्ये ३.७३% वाढ झाली होती. तसेच इंडियन रेटिंग अहवालातील माहितीनुसार, सप्टेंबर २०२३ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान बँकांच्या असुरक्षित किरकोळ कर्जाची वाढ ११.६% पर्यंत घसरली, जी सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या दोन वर्षांच्या कालावधीत २७% होती. निकालांपूर्वी बँकेचे शेअर्स ०.६% ने घसरले.

इटर्नल शेअर वाढण्यामागे प्रमुख कारण म्हणजे विश्लेषकांनी कंपनीच्या ईबीटा १३% वाढण्याची शक्यता वर्तवली होती. त्यांच्या माहितीनुसार,कंपनीच्या निव्वळ नफ्यात घसरण अपेक्षित असली तरी वाढत्या ईबीटसह वाढत्या मार्जिनमुळे ही सकारात्मकता कायम होती. तसेच कंपनीच्या महसूलातही थेट ६६% वाढ अपेक्षित असल्याचे तज्ञांनी म्हटले होते.

तसेच अँक्सिस बँकेच्या निकालानंतर बहुतांश विश्लेषकांनी बँकेच्या शेअरला 'Buy Call' दिला होता. १४४० ते १४६० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह विश्लेषकांनी शेअरला बाय कॉल दिला. दुसरीकडे सकारात्मकतेमुळे इटर्नल शेअर आज इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच कंपनीचा शेअर ३५८.५० रूपये प्रति शेअर या उच्चांकावर पोहोचला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >