
मोहित सोमण:कालच्या जबरदस्त रॅलीनंतर आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात पुन्हा वाढ झाली आहे. सेन्सेक्स २९९.२० अंकांने व निफ्टी ९५.२५ अंकांने उसळला आहे. बँक निर्देशांकासह मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये झालेल्या वाढीने एकूण निर्देशांक सकारात्मक स्थितीत पोहोचला आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ रिअल्टी (०.६०%), मिडिया (०.५५%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.६१%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.४३%), खाजगी बँक (०.८५%) निर्देशांकात वाढ झाली असून फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.२७%), आयटी (०.१४%) निर्देशांकात घसरण झाली आहे.
आगामी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरील वक्तव्यांकडे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. तसेच जागतिक पातळीवरील कमोडिटीमधील दबाव वाढला असला तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सेल ऑफ घसरल्याने शेअर बाजा रात स्थैर्य प्राप्त झाले. विशेषतः आज अस्थिरता निर्देशांक सकाळच्या सत्रात १% हून अधिक पातळीवर घसरला आहे. त्यामुळे सुरूवातीच्या कलात बाजारात सकारात्मकता झळकत आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ ओबेरॉय रिअल्टी (७.७८%), एमआरपीएल (५.५६%), अलोक इंडस्ट्रीज (२.९३%), फोर्टिस हेल्थ (२.४३%), इंटक्लेट डिझाईन (२.४२%), टाटा मोटर्स (२.३४%), होंडाई मोटर्स (२%), टीबीओ टेक (२%), वारी एनर्जीज (१.९४%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण केईआय इंडस्ट्रीज (५.१४%), अनंत राज (२.८९%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (२.८२%), एमसीएक्स (२.०४%), एचडीएफसी एएमसी (१.९३%), सीई इन्फोसिस्टिम (१.८७%), एल टी फायनान्स (१.५५%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (१.४३%) समभागात झाली आहे.