
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सलग चौथ्यांदा वाढ झाली आहे. आज शेअर बाजारातील मजबूत तेजीचा परिपाक म्हणून सेन्सेक्स थेट ८६२.२३ अंकांने उसळत ८३४६७.६६ पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी २६१.७५ अंकाने उसळत २५५८ ५.३० अंकावर स्थिरावला आहे. सेन्सेक्स व निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅप शेअरमध्ये मोठी वाढ झाल्याने आज बाजाराला सपोर्ट लेवल मिळाली असून सर्वाधिक वाढ लार्जकॅप शेअर्समध्ये झाल्याने बाजारात आज मोठी रॅली झाली आहे. विशेष उल्लेख म्हणजे सेन्से क्स बँक निर्देशांकात ८१०.८० अंकाने व बँक निफ्टीत ६२२.६५ अंकाने वाढ झाल्याने बाजार बुलिश झाल्याचे अधोरेखित झाले. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ आज बँक (१.१०%), एफएमसीजी (२.०२%), रिअल्टी (१.९०%),ऑटो (१.२७%), कंज्यूमर ड्युरेबल्स (१.५३%) निर्देशांकात झाले आहे. व्यापक निर्देशांकातील निफ्टी १०० (०.९४%), निफ्टी २०० (०.८६%), लार्ज मिड कॅप २५० (०.७१%) निर्देशांकात झाली आहे.
अनुकूल मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थिती, मजबूत देशांतर्गत तरलता आणि डॉलरचा प्रवाह कमी झाल्यामुळे शेअर बाजारात तेजीला पाठिंबा मिळाला आहे. गुंतवणूकदार इन्फोसिस, विप्रो, इटर्नल,आयओबी, जिओ फायनान्शियल, सायंट, विक्रम सोलर, वारी एनर्जी आणि झीईई यांच्या कॉर्पोरेट कमाईवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, जे जवळच्या काळातील बाजारातील भावनांसाठी नवा मूड निश्चित करतील अशी अपेक्षा आहे. नवा ट्रिगर नसल्यामुळे जागतिक स्तरावर आज कमोडिटीतील दबावही कमी झाला होता. भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात आज कुठलाही बदल झाला नसून चांदीच्या बाबतीत चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. रूपयातही डॉलरच्या तुलनेत खूप मोठी वाढ झाल्याने तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक टिकून ठेवल्याने अखेर आज शेअर बाजारात हिरव्या रंगात बंद झाले आहे.
युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.४१%), एस अँड पी ५०० (०.४०%), नासडाक (०.६६%) या तिन्ही बाजारात वाढ झाली आहे. हीच परिस्थिती आशियाई बाजारात दिवसभरात कायम होती. अखेरच्या कालावधीत आशियाई बाजारातील स्ट्रेट टाईम्स (०.२८%) वगळता इतर सर्व निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे.
आज दिवसभरात सर्वाधिक वाढ बीएलएस इंटरनॅशनल (१६.५०%), एथर एनर्जी (८.३५%), क्राफ्ट्समन ऑटो (५.८६%), ओबेरॉय रिअल्टी (५.३५%), अपार इंडस्ट्रीज (५.१३%), नेस्ले इंडिया (४.५२%), वरुण बेवरेज (३.५८%), एसआरएफ (३.५८%),ग्लोबल हे ल्थ (३.२७%), टाटा कंज्यूमर (३.१५%),वारी एनर्जीज (३.०१%),विशाल मेगामार्ट (२.६५%), कोटक महिंद्रा बँक (२.६०%), टायटन कंपनी (२.५७%) समभागात झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण केईआय इंडस्ट्रीज (५.६१%), अनंत राज (४.४१%), नेटवेब टेक्नॉलॉजी (४.३८%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (३.७२%), दिल्लीवरी (३.०३%), बँक ऑफ महाराष्ट्र (२.८२%), होंडाई मोटर्स (२.५४%), एचडीएफसी लाईफ इन्शु रन्स (२.४०%), एमसीएक्स (२.२१%), जीएमडीसी (१.८८%), इटर्नल (१.८३%), जेएम फायनांशियल (१.५८%), गुजरात गॅस (१.४७%), झेन टेक्नॉलॉजी (१.२९%), हिंदुस्थान झिंक (१.२७%) समभागात झाली आहे.