Thursday, October 16, 2025

Devendra Fadanvis : ब्रेकिंग पुणे! केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्र्यांच्या मंचावर सापाचा शिरकाव; सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ

Devendra Fadanvis : ब्रेकिंग पुणे! केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्र्यांच्या मंचावर सापाचा शिरकाव; सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ

पुणे : पिंपरी-चिंचवडजवळच्या किवळे (Kiwale) येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आज दुहेरी महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथे संस्थेचा सहावा दीक्षांत समारंभ (Convocation Ceremony) तसेच स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमांसाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याने, सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट ठेवण्यात आली आहे. मात्र, हा महत्त्वाचा सोहळा सुरू होण्यापूर्वीच एक मोठा सुरक्षा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती बसणार असलेल्या मंचाखाली एक विषारी साप आढळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणा त्वरित 'हाय अलर्ट' मोडवर गेली आहे. कार्यक्रमाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, मंत्री महोदय येण्यापूर्वी मंचाखालील सापाला त्वरित बाहेर काढण्याचे आणि परिसर पूर्णपणे सुरक्षित करण्याचे मोठे आव्हान आता आयोजक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या मुख्य मंचावर उपस्थित राहणार होते, त्याच मंचाखाली एक साप आढळून आला. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (VVIP) मंचावर उपस्थित राहण्यापूर्वी सापाचा शिरकाव झाल्याने, उपस्थित असलेल्या सर्व सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, लपलेल्या सापाला शोधून त्वरित बाजूला करण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर उभे राहिले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ आणि युद्धपातळीवर कार्यवाही केली. सर्व आवश्यक खबरदारी घेत ही परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणली गेली, ज्यामुळे VVIP च्या सुरक्षिततेची कोणतीही मोठी समस्या निर्माण झाली नाही.

कार्यक्रमासाठी राज्यमंत्री माधुरी मिसाळ सिम्बॉयसिस विद्यापीठात दाखल झाल्यानंतर प्रोटोकॉलवरून मोठा वाद निर्माण झाला. विद्यापीठाच्या प्रशासनाकडून मिसाळ यांचे गेटवर स्वागत करण्यासाठी कोणीही उपस्थित नव्हते. यामुळे राज्यमंत्री मिसाळ चांगल्याच संतापल्या. राज्यमंत्रीपदाच्या प्रोटोकॉलचा सिम्बॉयसिस प्रशासनाने अवमान केल्याचा आरोप करत त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण स्थिती होती. याच वेळी, दीक्षांत समारंभासाठी आलेल्या पालकांनी ऑडिटोरियमच्या बाहेर मोठा गोंधळ घातला. मंत्री महोदय उपस्थित असलेल्या या महत्त्वपूर्ण सोहळ्यात पालकांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. युनिव्हर्सिटी प्रशासनाकडून पालकांना कार्यक्रमाबाबत योग्य त्या सूचना वेळेत मिळाल्या नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या पालक वर्गाने प्रवेश नाकारल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला. या दोन घटनांमुळे महत्त्वाच्या VVIP कार्यक्रमाला मोठा गालबोट लागल्याचे चित्र निर्माण झाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >