Thursday, October 16, 2025

Infosys Q2Results : इन्फोसिसचा तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या निव्वळ नफ्यात १३% वाढ

Infosys Q2Results : इन्फोसिसचा तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या निव्वळ नफ्यात १३% वाढ

मोहित सोमण:देशातील सर्वात मोठ्या क्रमांक दोनची आयटी कंपनी इन्फोसिसने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर १३% वाढ निव्वळ नफ्यात मिळाली आहे. माहितीनुसार, कंपनीच्या गेल्या वर्षाच्या तिमाहीतील कंप नीच्या निव्वळ नफ्यात १३% वाढ झाली असून एकत्रित निव्वळ नफ्यात (Consolidated Net Profit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १३.२% वाढ प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत कंपनीला ६५०६ कोटींचा निव्वळ नफा झाला होता तो यंदा वाढत ७३६ ४ कोटीवर मिळाला आहे. कंपनीच्या महसूलात तिमाही बेसिसवर (Quarter on Quarter QoQ) २.२% वाढ मिळाली आहे.तर कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात ८.१% वाढ होत तो गेल्या तिमाहीतील ८६४९ कोटींच्या तुलनेत वाढत यंदा ९३५३ कोटींवर पोहोचले आ हे.

कंपनीच्या एकत्रित महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ८.६% वाढ प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ४०९८६ कोटींच्या तुलनेत वाढ होत या तिमाहीत ४४४९० कोटीवर महसूल गेला. ईबीआयटी (Earning before interest tax EBIT) मध्ये ६.२% वाढ नोंदवली गेली असून कंपनीचा ईबीआयटी ९३५३ कोटीवर पोहोचला आहे. कंपनीने संचालक मंडळाने मान्यता दिल्यानुसार, २३ रूपये प्रति शेअर लाभांश (Dividend) जाहीर केला आहे.

यापूर्वी कंपनीने बायबॅकचा निर्णय घेतला होता. या घोषणेपासून इन्फोसिसच्या शेअरमध्ये लवचिकता दिसून आली आहे, त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये एकूण ३.३% वाढ झाली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने निविदा ऑफर मार्गाने १८०० प्रति शेअर दराने  १ ८००० कोटी रुपयांच्या बायबॅकला मान्यता दिली आहे, जे सध्याच्या बाजारभावापेक्षा १९% प्रीमियम आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इन्फोसिस त्यांच्या उर्वरित इक्विटी शेअर्सपैकी २.४१% पुन्हा खरेदी करण्याची योजना आखत आहे, जे त्यांचे पाचवे शेअ र बायबॅक आहे आणि कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठे आहे.दुसऱ्या तिमाहीच्या निकालांपूर्वी, ५१ विश्लेषकांनी इन्फोसिसवर कव्हरेज दिले आहे. त्यापैकी ३६ विश्लेषकांनी स्टॉकवर 'खरेदी' सल्ला दिला होता. त्यापैकी १३ जणांना 'होल्ड' रेटिंग आहे.दोन विश्ले षकांनी आता 'विक्री' करण्याची शिफारस केली आहे निकालांच्या घोषणेपूर्वी, गुरुवारी इन्फोसिसचे शेअर्स ०.२४% कमी होऊन १४७०.९० वर बंद झाले होते. बाजार सत्र संपल्यानंतर इन्फोसिसने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.

'आम्ही आता सलग दोन तिमाहींमध्ये मजबूत वाढ केली आहे, जी आमची अद्वितीय बाजारपेठ स्थिती आणि ग्राहकांशी संबंधितता दर्शवते' असे इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलील पारेख म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >