Thursday, October 16, 2025

मोबाइलवर सतत बोलत राहण्याच्या धमकीने मुलीची आत्महत्या

मोबाइलवर सतत बोलत राहण्याच्या धमकीने मुलीची आत्महत्या

नांदगाव मुरुड :मुरुड तालुक्यातील खारमजगाव येथील एका मुलीला मोबाइलवर सतत माझ्याशी बोलली नाहीस तर तुझी बदनामी करीन अशी धमकी तिला देण्यात आली. या धमकीला कंटाळू्न मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली.

सदर घटनेची तक्रार मुरुड पोलिसात दाखल होताच तत्काळ मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन फॉरेन्सिक टिमसह घटनास्थळी पोहोचून सविस्तर माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. खार माजगाव येथील नथुराम वाडकर यांची मुलगी महाविद्यालयात शिकत होती. त्याच गावातील एक रहिवासी हेमंत कांबळे हा विवाहीत असून सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्याशी वारंवार फोनवरून चॅटिंग करीत तिचा मोबाइलवर पाठलाग करून कॉलवर बोलली नाहीस तर तुझ्या कॉलेजमध्ये मित्र-मैत्रिणींना आपल्या दोघांच्या संबंधाबद्दल सांगून तुझी बदनामी करेन, तुला जगू देणार नाही अशी धमकी देऊन प्रेम संबंध नसतानादेखील गावात त्यांचे प्रेम संबंध असल्याची बतावणी करीत असल्याने या मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल हेमंत कांबळे विरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुरुड पोलिसांनी दिली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा