
मोहित सोमण: गेले तीन महिने देशांतर्गत गुंतवणूकदार जागतिक अस्थिरतेचा चटका सहन करत आहेत. याच अस्थिरतेचा फटका बसल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणातून भारतीय शेअर बाजारातून काढून घेतली. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात बाजारात सेल ऑफ केले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने बाहेर पडल्यानंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) भारतीय शेअर बाजारात शेअर खरेदीसाठी परतत आहेत असे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. जागतिक अस्थिरतेत ही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत पोहोचवल्याने भविष्यकालीन फायदेशीर तरतूदीसाठी पुन्हा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतात परतत आहेत.
NSDL च्या आकडेवारीनुसार, ७ ते १४ ऑक्टोबर दरम्यान, एफआयआयने (FII) गेल्या सात सत्रांपैकी पाच सत्रांमध्ये निव्वळ खरेदी वाढवली आहे. दुय्यम बाजारात (Secondary Market) ३००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खरेदी केली आहे.प्राथमिक बाजारात त्यां ची कामगिरी आणखी मजबूत होती, ७६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती, तर एनएसई प्रोविजनल आकडेवारीनुसार १५ ऑक्टोबर रोजी १६२ कोटी रुपयांची अतिरिक्त निव्वळ गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांनी केली आहे. परदेशी खरेदीचा परतावा भारतीय बेंच मार्कमध्ये स्थिर तेजीसह दर्शविला जातो आहे जो भारतीय बाजार निर्देशांक व गुंतवणूकदारांसाठी चांगले संकेत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये सुमारे ३% वाढ झाली आहे, तर बीएसई (BSE) मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्दे शांक अनुक्रमे ३.४%%आणि १.७% वाढले आहेत.
हा पूर्वीच्या ट्रेंडपेक्षा पूर्णपणे उलट आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान, आरबीआयने आणि सरकारने जीएसटीवर कपात, जूनमध्ये रेपो दर कपात आणि S&P द्वारे भारताच्या सार्वभौम रेटिंगमध्ये सुधारणा यासारखे वाढीस आधार देणारे उपाय लागू केले अस तानाही, एफआयआयने घसरत असलेल्या रूपयासह इतर भूराजकीय कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी आपले पैसे बाजारातून काढले होते. दुय्यम बाजारातून २ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली होती ज्याचा फटका देशांतर्गत गुंतवणूकदा रांनाही बसला. वास्तविकता परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या तुलनेत भारतीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक राखली असली तरी त्यानंतर अतिरिक्त टॅरिफमुळे क्षेत्रीय निर्देशांकात व निर्यातीत घसरण झाली. मात्र दुसरीकडे अमेरिकेतील अर्थव्यवस्था ना जूक होत झाली. जागतिक अस्थिरतेचा कणा असलेल्या युएस बाजारातील महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कमोडिटी व रूपयांतही दबाव निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीचे बहिर्वहन (Outflow) मो ठ्या प्रमाणात झाले.
त्या काळात, भारतीय शेअर बाजार जागतिक समभागांपेक्षा मागे पडला, सेन्सेक्स आणि निफ्टी फक्त ३% वाढले, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ३% आणि ४% घसरले. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या संभाव्य आशावादामुळे तसेच या महि न्याच्या अखेरीस यूएस फेडरल रिझर्व्ह दर कपातीच्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना पाठिंबा मिळत आहे, ज्यामुळे उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये तरलता प्रवाह वाढू शकतो. विश्लेषकांचे म्हणणे आहे की कमकुवत रुपया, मंदावलेली देशांतर्गत कामगिरी आणि आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या सहामाहीत निफ्टी५० निर्देशांकांच्या उत्पन्न वाढीची अपेक्षा यामुळे भारत परदेशी गुंतवणूकदारांसाठी अधिकाधिक आकर्षक बनू शकतो. तथापि, काही तज्ञ सावध करतात की नूतनीकरण केलेल्या खरेदीच्या मागील टप्प्यांनंतर अनेकदा विक्रीचे नवीन फेरे (Rounds) झाले आहेत, ज्यामुळे असे सूचित होते की हा बदल एफआयआय (FII) प्रवाहात शाश्वत पुनर्प्राप्तीची सुरुवात दर्शवितो की नाही हे पाहणे बाकी आहे.