डोनाल्ड ट्रम्प यांची आता अर्जेंटिनाला धमकी

झेवियर मिलेई निवडणूक हरल्यास आर्थिक रसद बंद करण्याचा इशारा


वॉशिग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मिलेई हे निवडणूक हरल्यास अर्जेंटिनाची थेट आर्थिक रसद बंद करण्याची धमकी दिली आहे
मागील काही महिन्यांत अनेक देशांवर टॅरिफ लादले. ट्रम्प यांच्या टॅरिफचा अनेक देशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असल्याचं दिसून येत आहे. एवढंच नाही तर टॅरिफच्या मुद्द्यांवरून डोनाल्ड ट्रम्प हे कधी चीनला, तर कधी भारताला, तर कधी रशियाला धमकी देताना दिसून आले आहेत. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा मोर्चा अर्जेंटिनाकडे वळवल्याचे दिसून येत आहे.


अडचणीत सापडलेल्या अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी २० अब्ज डॉलर्स देण्याचे आश्वासन दिल्यानंतर जर एखादा नेता मध्यावधी निवडणुका जिंकू शकला नाही, तर आम्ही उदार होणार नाहीत, अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी अर्जेंटिनाला सुनावले आहे.


दरम्यान, यावेळी ट्रम्प यांनी झेवियर मिलेई यांचं कौतुक महान नेता असेही केले. ट्रम्प म्हणाले की, ते निवडणुकीत त्यांच्या वैचारिक सहयोगीला पूर्णपणे समर्थन देतील. ट्रम्प यांनी वारंवार झेवियर मिलेई यांना राजकीय पाठिंबा दिला, तसेच अमेरिकेने २० अब्ज डॉलर्सच्या कराराची घोषणाही केली आहे.


Comments
Add Comment

स्वीडन दौऱ्यावर महाराष्ट्राचा मेरीटाईम अजेंडा, नितेश राणे यांची प्रभावी बैठकांची मालिका

स्टॉकहोम : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे होणाऱ्या ‘इंडिया मेरिटाइम वीक’ या आंतरराष्ट्रीय

मादागास्करमध्ये जेन-झीच्या आंदोलनाने सरकार हादरले, राष्ट्रपतींचे देश सोडून पलायन

अँटानानारिवो : नेपाळनंतर आता आफ्रिकन देश मादागास्करमध्ये जेन-जी च्या उग्र आंदोलनाने वातावरण

बांगलादेशातील कापड कारखान्यात भीषण आग, ९ जणांचा मृत्यू

ढाका : बांगलादेशमधील एक कपडा कारखाना आणि केमिकल गोदामात भीषण आग लागली. ही घटना मीरपूरच्या रूपनगर भागातील आहे. या

२०२६ मध्ये 'कॅश क्रश'मुळे जगाची अर्थव्यवस्था कोसळणार? 'कॅश क्रश' म्हणजे काय?

बाबा वांगाची भयावह भविष्यवाणी; तिसरे महायुद्ध आणि एलियनच्या संपर्काचीही चर्चा 'बाल्कनच्या नोस्ट्रेडॅमस'च्या

हमासच्या कैदेतून सर्व २० इस्राायली ओलिसांची सुटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामध्ये सुरू केलेल्या शांतता योजनेला यश आले आहे. इस्रायल आणि

अर्थशास्त्रासाठीचे पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम : रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने आज २०२५चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर केला. यंदाचा