Thursday, October 16, 2025

डोनाल्ड ट्रम्प यांची आता अर्जेंटिनाला धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांची आता अर्जेंटिनाला धमकी

झेवियर मिलेई निवडणूक हरल्यास आर्थिक रसद बंद करण्याचा इशारा

वॉशिग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मिलेई हे निवडणूक हरल्यास अर्जेंटिनाची थेट आर्थिक रसद बंद करण्याची धमकी दिली आहे मागील काही महिन्यांत अनेक देशांवर टॅरिफ लादले. ट्रम्प यांच्या टॅरिफचा अनेक देशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असल्याचं दिसून येत आहे. एवढंच नाही तर टॅरिफच्या मुद्द्यांवरून डोनाल्ड ट्रम्प हे कधी चीनला, तर कधी भारताला, तर कधी रशियाला धमकी देताना दिसून आले आहेत. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा मोर्चा अर्जेंटिनाकडे वळवल्याचे दिसून येत आहे.

अडचणीत सापडलेल्या अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी २० अब्ज डॉलर्स देण्याचे आश्वासन दिल्यानंतर जर एखादा नेता मध्यावधी निवडणुका जिंकू शकला नाही, तर आम्ही उदार होणार नाहीत, अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी अर्जेंटिनाला सुनावले आहे.

दरम्यान, यावेळी ट्रम्प यांनी झेवियर मिलेई यांचं कौतुक महान नेता असेही केले. ट्रम्प म्हणाले की, ते निवडणुकीत त्यांच्या वैचारिक सहयोगीला पूर्णपणे समर्थन देतील. ट्रम्प यांनी वारंवार झेवियर मिलेई यांना राजकीय पाठिंबा दिला, तसेच अमेरिकेने २० अब्ज डॉलर्सच्या कराराची घोषणाही केली आहे.

Comments
Add Comment