Thursday, October 16, 2025

निवडणूक प्रचारासाठी भाजपची रणनिती ठरली !

निवडणूक प्रचारासाठी भाजपची रणनिती ठरली !

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्यावतीने २२७ जागा लढून आम्ही १५० हून अधिक नगरसेवक निवडून आणले जातील असा विश्वास व्यक्त भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला. तसेच येणाऱ्या निवडणुकीत महायुतीने मुंबईत हाती घेतलेली आणि पूर्ण केलेली विकासकामे तसेच मागील २५ वर्षांत शिवसेनेने महापालिकेत केलेला भ्रष्टाचार हाच प्रचाराचा मुद्दा असेल आणि याच मुद्यावर निवडणून लढवली जाईल असे स्पष्ट संकेतच साटम यांनी दिले आहेत.

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीबाबत पत्रकारांशी अनोपचारिक चर्चा करता भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईचा वचननामा हा जनतेच्या मनातील असून त्यादृष्टीकोनातून घरोघरी जाऊन याबाबतच्या सूचना जाणून घेतल्या जात आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी दोन तरुण इंटर्नची निवड करून ५० इंटरनंशिप दिली जाईल. तसेच बेस्ट उपक्रमाचे सुसूत्रिकरण, महालिका शाळा आणि रुग्णालयांच्या अंतर्गत कार्यपध्दतीत सुधारणा आदी प्रमुख कामांवर महायुतीचा फोकस असेल.

मुंबईतील प्रत्येक प्रभागांमध्ये भाजपचा नगरसेवक कुठे निवडून येईल याची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत तीन कोअर कमिटीच्या बैठका झाल्या असून त्यामध्ये आलेल्या माहितीनुसार प्रभागांमधील विकासकामांवर भर दिला जात आहे. आगामी निवडणुकीकरता भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटप हे ज्या पक्षाचे प्राबल्य आणि निवडून येण्याची क्षमता यावरच असेल. मागील २५ वर्षांत महापालिकेत शिवसेनेने भ्रष्टाचारच केलेला असून या पक्षाला महापालिकेपासून लांब ठेवण्याचे काम महायुतीच्या माध्यमातून होईल. मागील २५ वर्षांत शिवसेनेने महापालिकेत सत्ता असताना किती प्रकल्प केले, किती योजना राबवल्या आणि पायाभूत सुविधा प्रकल्प साकारले बाची माहिती द्यावी, आणि आम्ही राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईत हाती घेतले प्रकल्प आणि विकास कामे तसेच पूर्ण केलेले पायाभूत प्रकल्प यांची देत्तो अशा शब्दांतच साटम यांनी उबाठाला आव्हान दिले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >