
मोदी, शहा, राजनाथ यांच्यासह ४० नेत्यांची यादी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे.
याशिवाय जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, देवेंद्र फडणवीस, स्मृती इराणी आणि रविशंकर प्रसाद यांसारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. भाजपने बिहारमधील १०१ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. ही निवडणूक ६ आणि ११ नोव्हेंबरला दोन टप्प्यांत होणार आहे आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.