Thursday, October 16, 2025

भारती एअरटेलने ‘एअरटेल क्लाउड' साठी आयबीएमसोबत धोरणात्मक भागीदारी

भारती एअरटेलने ‘एअरटेल क्लाउड' साठी आयबीएमसोबत धोरणात्मक भागीदारी

नवी दिल्ली:भारती एअरटेलने त्यांच्या नुकत्याच सुरू केलेल्या एअरटेल क्लाउडला सक्षम करण्यासाठी आयबीएमसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे.या भागीदारीमुळे एअरटेल क्लाउडची टेल्को-ग्रेड विश्वसनीयता, उच्च दर्जाची सुरक्षा आणि डेटा रेसिडेन्सी ((स्थानिक डेटा संचयन)) आयबीएमच्या क्लाउड तंत्रज्ञान आणि विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी (AI) बनवलेल्या आधुनिक सॉफ्टवेअरसोबत जोडली जाईल असे भारती एअरटेल कंपनीने यावेळी स्पष्ट केले. एकत्रितपणे एअरटेल आणि आयबीएम (IB M) या दोन्ही कंपन्यांचे उद्दिष्ट नियमनाधीन उद्योगांतील उद्योगसंस्थांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर्कलोड्स अधिक कार्यक्षमतेने वाढविण्यास सक्षम बनविणे असल्याचे कंपन्यांनी म्हटले. ही भागीदारी ऑन-प्रिमाइस (स्थानिक सर्व्हर), क्लाउड, एकापेक्षा जास्त क्लाउ ड्स आणि एज (edge) इन्फ्रास्ट्रक्चर यांसह सर्व स्तरांवर अखंड इंटरऑपरेबिलिटी (परस्पर सुसंगतता) प्रदान करण्यास मदत करेल.

या भागीदारीच्या माध्यमातून, एअरटेल क्लाउड ग्राहकांना आयबीएम पॉवर सिस्टम्स पोर्टफोलिओ सेवा स्वरूपात (सेवा म्हणून) वापरू शकतील, ज्यामध्ये नवीनतम पिढीचे आयबीएम पॉवर 11(IBM Power11) स्वयंचलित आणि AI-सक्षम सर्व्हर समाविष्ट अस तील. हे सर्व्हर बँकिंग, आरोग्य, सरकारी आणि इतर नियंत्रित क्षेत्रांतील मिशन-क्रिटिकल (अत्यावश्यक) अनुप्रयोगांसाठी उपयुक्त ठरतील. पॉवर 11 हायब्रिड प्लॅटफॉर्म मध्ये आयबीएम पॉवर एआयएक्स, आयबीएम आय, लिनक्स आणि एसएपी क्लाउड ईआरपी यांसारख्या महत्त्वाच्या एंटरप्राईजेस वर्कलोड्सनाही समर्थन देणार आहे.याशिवाय, ही भागीदारी आयबीएम पॉवरवरील एसएपी ग्राहकांना त्यांच्या एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग रूपांतरणामध्ये सहाय्य करेल, ज्याद्वारे ते एसएपी क्लाउड ईआरपी ऑन आयबीएम पॉव र व्हर्च्युअल सर्व्हर मध्ये रूपांतर (transformation) सुलभ करण्यास मदत करेल.

याविषयी बोलताना गोपाल विट्टल, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारती एअरटेल म्हणाले आहेत की, 'एअरटेल क्लाउड अत्यंत सुरक्षित आणि नियामक अनुरूप (कम्प्लायंट) राहील, अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे. हे एक चपळ आ णि लवचिक (रेझिलियंट) क्लाउड प्लॅटफॉर्म म्हणून उद्योगात नवे मापदंड निर्माण करत आहे. आज, आयबीएम (IBM) सोबतच्या या भागीदारीमुळे आम्ही आमच्या क्लाउड प्लॅटफॉर्ममध्ये अनेक महत्त्वपूर्ण क्षमता जोडत आहोत, ज्यामुळे आयबीएम पॉवर सिस्ट म्स वरून स्थलांतराची आवश्यकता असलेल्या आणि AI-सक्षमतेसाठी अपेक्षित असलेल्या विविध उद्योगांच्या गरजा पूर्ण केल्या जातील. या भागीदारीद्वारे, आम्ही भारतातील आमच्या उपलब्धता क्षेत्रांची संख्या चारवरून दहापर्यंत वाढवत आहोत, आणि या सर्व झोन आमच्या स्वतःच्या पुढील पिढीतील शाश्वत डेटा सेंटर्समध्ये होस्ट केली जातील. तसेच, आम्ही एकत्रितपणे लवकरच मुंबई आणि चेन्नई येथे दोन नवीन मल्टिझोन रीजन्स (MZRs) स्थापन करणार आहोत.'

तसेच रॉब थॉमस, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी, आयबीएम (IBM), म्हणाले आहेत की,'आजच्या काळात उद्योगसंस्थांना आधुनिकीकरणासोबत वाढत्या नियमनाधीन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संबंधी आवश्यकतांम ध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. भारती एअरटेलसोबतच्या आमच्या या भागीदारीद्वारे, भारतभरातील ग्राहकांना आयबीएमच्या नाविन्यपूर्ण क्लाउड सेवांचा लाभ घेता येईल, ज्या त्यांच्या धोरणात्मक व्यवसाय प्राधान्यांना पूरक अशा वर्कलोड्ससाठी डिझाइन केल्या आहेत. आम्ही एकत्रितपणे एआय(AI) च्या युगात ग्राहकांना खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणण्यास मदत करू.'

आयबीएम च्या वॉट्सनएक्स आणि रेड हॅट ओपनशिफ्ट (AI) एआय या तंत्रज्ञानावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) इंफरन्सिंगसाठीच्या सॉफ्टवेअर स्टॅकच्या माध्यमातून, भारतातील ग्राहकांना हायब्रिड क्लाउड वातावरणांमध्ये एआय इंफरन्स चालविण्याची क्षमता मिळेल. ही क्षमता आयबीएमच्या एंटरप्राइज-ग्रेड क्लाउड प्लॅटफॉर्मसोबत एकत्रित आहे, ज्यामध्ये नाविन्यपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर 'आयएएएस' (IaaS) आणि 'पीएएएस' (PaaS) ऑफरिंग्स असलेला एंटरप्राइज-ग्रेड क्लाउड प्लॅटफॉर्म, तसेच उत्पादकता वाढव ण्यासाठी मुख्य एंटरप्राइज कामांमध्ये (workflows) 'जनरेटिव्ह एआयचा' (generative AI) प्रभाव वाढवण्यासाठी डिझाइन केलेला आयबीएमचा ऑटोमेशन पोर्टफोलिओ उपलब्ध होईल. ग्राहकांना रेड हॅटच्या हायब्रिड क्लाउड सोल्यूशन्स — जसे रेड हॅट ओप नशिफ्ट व्हर्च्युअलायझेशन, रेड हॅट ओपनशिफ्ट आणि रेड हॅट एआय — यांचा वापर करता येईल.

या क्षमतांव्यतिरिक्त, आयबीएमची हायब्रिड क्लाउड आर्किटेक्चर ग्राहकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्वांटम कॉम्प्युटिंगमधील भविष्यातील नवोन्मेष (इनोव्हेशन) सक्षम करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. एअरटेल मल्टिझोन रीजन्स भारतीय उ द्योगसंस्थांना त्यांची प्रतिकारशक्ती (रेझिलियन्स) बळकट करण्यास, डेटा रेसिडेन्सीशी संबंधित आवश्यकतांचे पालन करण्यास आणि अत्यावश्यक (मिशन-क्रिटिकल) वर्कलोड्स व अनुप्रयोग सतत कार्यरत ठेवण्यास मदत करतील. एअरटेल आणि आयबीएम (IBM) यांची ही भागीदारी भारतीय उद्योगसंस्थांना मोठ्या प्रमाणावर डिजिटल नवकल्पना (डिजिटल इनोव्हेशन) वेगाने साध्य करण्यास सक्षम करेल.

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >