
संपूर्ण दुचाकी श्रेणीवर विशेष विमा फायदे आणि RayZR 125 Fi hybrid स्कूटरवर कॅशबॅक ऑफर्स
प्रतिनिधी:महाराष्ट्र दिवाळी सण उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यासाठी सज्ज असताना इंडिया यामाहा मोटर क्षेत्रामधील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्स घेऊन आली आहे. या शुभप्रसंगी यामाहा (Yamaha)त्यांच्या मोटरसायकल्स व स्कूटर्सवर जीएसटी फा यदे, विमा ऑफर्स आणि कॅशबॅकसह विशेष डील्स देत आहे, ज्यामुळे दिवाळीच्या कालावधीत दूचाकी खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना ही संधी चालून आलेली दिसते.
यामाहाच्या दिवाळी स्पेशल ऑफर्स:
R15 V4:जवळपास १५७३७ रूपये (जीएसटी फायदा) आणि Rs. ६५६० रूपये (विमा फायदा)
MT-15: जवळपास १४९६४ रूपये (जीएसटी फायदा) आणि ६५६० रूपये (विमा फायदा)
FZ-S Fi Hybrid: जवळपास १२०३१ रूपये (जीएसटी फायदा) आणि ६५०१ रूपये (विमा फायदा)
Fascino 125 Hybrid: जवळपास ८५०९ रूपये (जीएसटी फायदा) आणि ५४०१ रूपये (विमा फायदा)
RayZR 125 Fi: जवळपास ७७५९ रूपये (जीएसटी फायदा) आणि ३७९९ रूपये (विमा फायदा) या ऑफर आता ग्राहकांसाठी उपलब्ध असून कंपनीने ग्राहकांना जवळच्या यामाहा डिलरशिपला भेट देण्याचे आवाहन केले असून या फेस्टिव्ह ऑफर्सचा आनंद घेण्यासाठी कंपनीकडून एक नामी संधी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यामाहाच्या विविध उत्पादन पोर्टफोलिओमध्ये YZF-R3 (321cc), MT-03 (321cc), YZF-R15M (155cc), YZF-R15 V4 (155cc), YZF-R15S V3 (155cc), MT-15 V2 (155cc) आणि FZ-S Fi Hybrid (149cc), FZ-S Fi (149cc) आणि FZ-X yama (149cc) सारख्या FZ मालिकेतील बाइक्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, यामाहा Aerox 155 आवृत्ती S (155cc), Aerox 155 (155cc), Fascino S 125 Fi Hybrid (125cc), Fascino 125 Fi Hybrid (125cc), RayZR 125 Fi Hybrid (125cc) आणि RayZR Street Rally 125 Fi Hybrid (125cc) यासह अनेक स्कूटर ऑफर करते.