Wednesday, October 15, 2025

Tata Communications Q2 Results: टाटा कम्युनिकेशनचा निव्वळ नफा ३.७% घसरला तरीही शेअरमध्ये ४.४% उसळी

Tata Communications Q2 Results: टाटा कम्युनिकेशनचा निव्वळ नफा ३.७% घसरला तरीही शेअरमध्ये ४.४% उसळी

मोहित सोमण: टाटा कम्युनिकेशन लिमिटेडने आपला तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीचा शेअर ४% इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. सत्र बंद होताना कंपनीचा शेअर ३.४९% उसळी घेत १९३८ रूपये प्रति शेअरवर बंद झाला आहे. कंपनीच्या निव्व ळ नफ्यात ३.७% घसरण होऊन देखील शेअरमध्ये वाढ झाली आहे. निकाल जाहीर होताच कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. मात्र सत्राच्या मध्यास शेअर रिबाऊंड होऊन वाढला होता. कंपनीच्या निकालानुसार, कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या मह सूलात (Revenue from Operations) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २.३% वाढ झाली होती. मागील वर्षाच्या तिमाहीतील ५९६० कोटींच्या तुलनेत यंदा तिमाहीतील महसूल ६१०० कोटींवर पोहोचला आहे. तर कंपनीच्या निव्वळ नफ्यात ३.७% वाढ झा ल्याने मागील वर्षाच्या तिमाहीतील १९० कोटींच्या तुलनेत १८३ कोटींवर नफा घसरला. कंपनीच्या ईबीटामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३.२% घसरण झाली. मागील वर्षाच्या तिमाहीतील ११३७ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ११७४ कोटींवर घसरण झाली आहे.

कंपनीच्या डेटा सर्विसेस महसूलात ५१५१ कोटीवरून ५२०४ कोटींवर वाढ झाली आहे. तर व्हॉईस सोल्युशन्स महसूलात ३९४ कोटींवरून ४०६ कोटींवर वाढ झाली आहे. कॅंपेन रजिस्टरी व्यवसायात इयर ऑन इयर बेसिसवर १८९.३८ कोटींवरुन २०२.५४ कोटींव र वाढ झाली आहे. तसेच ट्रान्सफॉर्मेशन व्यवसायात २२४ कोटींवरून २८६ कोटीवर वाढ झाली आहे.बँकेच्या तिमाही निकालावर भाष्य करताना,'या काळात सरकारी प्रकल्पांमध्ये काही महत्त्वपूर्ण विजय मिळाले आहेत, ज्यामुळे डिजिटल इंडियामध्ये आमची भू मिका पुढे गेली आहे. आमच्या धोरणात्मक क्षेत्रात आमची नवीन लाँच केलेली उत्पादने, ज्यात व्हॉइस एआय आणि क्लाउड नेटवर्किंग यांचा समावेश आहे, आमच्या ग्राहकांमध्ये लक्षणीय रस आणि स्वीकृती निर्माण करत आहेत, जे आमच्या उपायांची ताकद आ णि प्रासंगिकता दर्शवितात' असे एमडी आणि सीईओ एएस लक्ष्मीनारायणन म्हणाले आहेत. सत्राअखेरीस कंपनीचा शेअर ४.४१% उसळत १९५५.१० रूपये प्रति शेअरवर बंद झाला होता.

Comments
Add Comment