Wednesday, October 15, 2025

Stock Market Update: शेअर बाजारात वाढ ! सेन्सेक्स निफ्टी 'इतक्याने' उसळला जागतिक वातावरण वाढीस पुरक

Stock Market Update: शेअर बाजारात वाढ ! सेन्सेक्स निफ्टी 'इतक्याने' उसळला जागतिक वातावरण वाढीस पुरक

मोहित सोमण:जागतिक पातळीवरील काल संमिश्रित कामगिरीनंतर आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी शेअर बाजारात तेजी दिसत आहे. सेन्सेक्स ३३३.४६ अंकाने व निफ्टी ८६.९५ अंकाने वाढला आहे. विशेषतः जागतिक पातळीवरील कालच्या फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याच्या संकेतानंतर जागतिक सकारात्मक चित्र दिसत असताना भारतीय शेअर बाजारात मजबूत फंडामेंटलमुळे तेजी आणखी दिसत आहे. आज प्रामुख्याने खाजगी बँक (०.१०%) वगळता इ तर क्षेत्रीय विशेष निर्देशांकात वाढ झाली आहे. रिअल्टी (१.१८%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.०२%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (२.२६%), तेल व गॅस (०.३२%), मिडकॅप सिलेक्ट (०.८५%) निर्देशांकात वाढ झाली आहे.

सकाळी गिफ्ट निफ्टीतील वाढीसह आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात जकार्ता कंपोझिट (१.०६%) वगळता इतर सर्व निर्देशांकात वाढ दिसून आली ज्यामध्ये सर्वाधिक वाढ कोसपी (१.९९%), सेट कंपोझिट (०.७२%), निकेयी २२५ (१.३१%), सेट कंपो झिट (०.७४%) निर्देशांकात वाढ झाली आहे.सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ आज परसिस्टंट सिस्टिम (६.५९%), आयसीआयसीआय लोंबार्ड (६.३१%), न्यूजेन सॉफ्टवेअर (६.२१%), टाटा कम्युनिकेशन (३.५१%), बँक ऑफ महाराष्ट्र (३.५०%), अनंत राज (३.३५%),शिंडलर (३.०७%), कोफोर्ज (२.७७%), गोदरेज प्रोपर्टी (२.७४%), फिनिक्स मिल्स (२.१०%), वन ९७ (१.९०%), सिग्नेचर ग्लोबल (१.८३%), क्रिसील (१.७८%), वारी एनर्जीज (१.७०%), एल टी फायनान्स (१.६७%) समभागात झाली आहे.

सुरूवातीच्या कलात सर्वाधिक घसरण आज टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (३.८८%), सी ई इन्फोसिस्टिम (२.३२%), हिताची एनर्जी (१.९३%), ज्युबीलंट इनग्रेव्ह (१.८७%), कजारिया सिरॅमिक्स (१.६६%), उषा मार्टिन (१.३६%), बिकाजी फूडस (१.२६%), टेक म हिं द्रा (१.२१%), जेके सिमेंट (१.२०%), आयटीआय (१.१४%), गोदरेज इंडस्ट्रीज (०.९८%), रिलायन्स पॉवर (०.९३%), वेलस्पून लिविंग (०.८९%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >