Wednesday, October 15, 2025

Stock Market: सेन्सेक्सकडून प्रथमच ८२६५० पातळी पार तर निफ्टी एक महिन्याच्या उच्चांकावर जागतिक अस्थिरतेतही भारतीय बाजाराचे जबरदस्त प्रदर्शन

Stock Market: सेन्सेक्सकडून प्रथमच ८२६५० पातळी पार तर निफ्टी एक महिन्याच्या उच्चांकावर जागतिक अस्थिरतेतही भारतीय बाजाराचे जबरदस्त प्रदर्शन

मोहित सोमण:शेअर बाजारातील मजबूत फंडामेंटल आधारे निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सत्राच्या अखेरीस ५७५.४५ अंकांने व निफ्टी १७८.०५ अंकाने उसळला असल्याने सेन्सेक्स ८२६०५.४३ पातळीवर व निफ्टी २५३२३.५५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स आज शेअर बाजार जागतिक अस्थिरतेतही दोलायमान स्थितीत न जाता गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी वाढल्याने आज शेअर बाजारात वाढ झाली. विशेषतः आज रिअल्टी, पीएसयु बँक, निफ्टी नेक्स्ट ५०, बँक, एक्स बँक फायनांशियल सर्विसेस या शेअर्समध्ये झालेल्या रॅलीमुळे अखेर इक्विटी बेंचमार्क निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाला आहे. आज केवळ मिडिया निर्देशांकात घसरण झाली आहे. आज सेन्सेक्स पहिल्यादांच ८२६५० पातळीवर गेला होता तसेच निफ्टीने आज चांगली कामगिरी करत महिन्या तील सर्वाधिक उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. मात्र जागतिक पातळीवरील शेअर बाजाराला आज संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

आज ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपसह मिडकॅप व स्मॉलकॅप शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजारात संतुलित वाढ मिळाली आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का या आशेने जगभरात कौल दिल्याने विशेषतः वित्तीय, बँक शेअर्समध्ये वाढ प्रकर्षाने दिसते. अ खेरच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या खरेदीच्या तुलनेत घरगुती गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवल्याने शेअर बाजारात आणखी वाढ झाली.

फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेतील कामगार बाजारपेठेत मंदी असल्याचे मान्य केले परंतु सप्टेंबरमध्ये २५ बेसिस पॉइंट दर कपात केल्यानंतर महागाईचा अंदाज स्थिर राहिल्याने अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असे सांगितले. आशियाई बाजारपेठां मध्ये ०.९% वाढ झाली, जरी सध्या सुरू असलेल्या अमेरिका-चीन व्यापार तणावामुळे जोखीम घेण्याची क्षमता मर्यादित झाली. कमी अमेरिकन व्याजदरांमुळे सामान्यतः भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये परकीय गुंतवणूक वाढते. दुसरीकडे भारतीय अर्थ व्यवस्थेत आगामी दिवसात तरलता वाढू शकते कारण एका अहवालातील माहितीनुसार, यावर्षी ५० बेसिस पूर्णांकाची कपात आरबीआय रेपो दरात करू शकते. विशेषतः आयपीओंची संख्या वाढलेली असताना मोठ्या प्रमाणात सणासुदीच्या काळात ग्राहक उप भोगात वाढ अपेक्षित आहे. सोन्याच्या व चांदीच्या दरात आजही वाढ कायम असून कच्च्या तेलाच्या निर्देशांकात आज अंशतः वाढ झाली आहे.

युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.४२%) वगळता एस अँड पी ५०० (०.१६%), नासडाक कंपोझिट (०.७६%) निर्देशांकात घसरण झाली आहे. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात सर्व निर्देशांकात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ कोसपी (२.६१%), शांघाई कंपोझिट (१.२०%), हेंगसेंग (१.८०%), निकेयी २२५ (१.७७%) निर्देशांकात झाली आहे.

आजच्या अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ आयसीआयसीआय लोंबार्ड (८.९२%), बँक ऑफ महाराष्ट्र (७.२६%), परसिसटंट सिस्टिम (७.२४%), मदर्सन वायरिंग (५.२६%), सीईएससी (५.२४%), पुनावाला फायनान्स (४.८९%), वोडाफोन आयडिया (४.६७%),ब्रि गेड एंटरप्राईजेस (४.२७%), टाटा कम्युनिकेशन (४.२६%), न्यूजेन सॉफ्टवेअर (४.४०%), आय आय एफ एल फायनान्स (४.३७%), सिग्नेचर ग्लोबल (४.२९%), आदित्य बिर्ला फॅशन (४.१३%), बजाज फायनान्स (४%), नेस्ले इंडिया (३.८९%), कोफोर्ज (३.८२%) ,एयु स्मॉल फायनान्स बँक (३.८१%), गोदरेज प्रोपर्टी (३.८०%), स्टार हेल्थ इन्शुरन्स (३.७८%), टीबीओ टेक (३.५१%), आयटीसी हॉटेल्स (३.४८%) समभागात झाली आहे.

आजच्या अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (९.०८%), नुवोको विस्टा (५.१८%), बीएलएस इंटरनॅशनल (४.७२%), जेके सिमेंट (३.३३%), बिकाजी फूडस (२.७०%), एचबीएल इंजिनिअरिंग (२.३७%), उषा मार्टिन (२.२९%), डेटा पँट र्न (२.२४%), पीबी फिनटेक (२.०२%), दिल्लीवरी (१.८३%), अपार इंडस्ट्रीज (१.७६%), सिमेन्स इंजिनिअरिंग (१.६६%), एम आर एफ (१.५१%), बर्जर पेंटस (१.४४%), सनटिव्ही नेटवर्क (१.४०%), इंडसइंड बँक (१.३९%), सीपीसीएल (१.३३%),टाटा मोटर्स (१ .१६%), बजाज ऑटो (१.१५%), इन्फोसिस (१.०४%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर बजाज फायनान्सने काय विश्लेषण केले?

बाजार बंद भाष्य -

१५ ऑक्टोबर रोजी भारतीय इक्विटी बेंचमार्क मजबूत स्थितीत बंद झाले, निफ्टी २५३०० पातळीच्या वर बंद झाला. फेड अध्यक्षांच्या व्याजदरांवरील उदासीन टिप्पण्यांमुळे आणि परिमाणात्मक कडकपणामध्ये संभाव्य विराम देण्याच्या संकेतांमुळे दोन सत्रांच्या घ सरणीनंतर बाजाराने पुनरागमन केले, ज्यामुळे जागतिक जोखीम भावनांना चालना मिळाली. बंद होताना, सेन्सेक्स ५७५.४५ अंकांनी किंवा ०.७०% ने वाढून ८२६०५.४३ वर पोहोचला, तर निफ्टी १७८.०५ अंकांनी किंवा ०.७१% ने वाढून २५३२३.५५ वर स्थिराव ला .मीडिया निर्देशांक वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले, ज्याचे नेतृत्व रिअल्टी समभागांमध्ये ३% ची जोरदार तेजी होती. पॉवर, कंझ्युमर ड्युरेबल्स, पीएसयू बँक, मेटल आणि टेलिकॉम निर्देशांक १-२% च्या दरम्यान वाढले, जे व्यापक-आधा रित खरेदीच्या आवडीचे संकेत देते. व्यापक बाजाराच्या आघाडीवर, मिडकॅप निर्देशांक १.११% वर चढला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.८२% वर आला, ज्यामुळे दुय्यम क्षेत्रात सततची ताकद अधोरेखित झाली.

निफ्टी आउटलुक

इंडेक्सने उच्च उच्च आणि उच्च निम्न सिग्नलसह एक तेजीची मेणबत्ती तयार केली जी मागील सत्राच्या मंदीच्या अनुपस्थितीचे संकेत देत होती जी सकारात्मक गतीची सातत्य दर्शवते. बुधवारी सत्रातील निर्देशांक गेल्या आठवड्याच्या उच्चांक (२५३३०) वर गेला जो साप्ताहिक चार्टमध्ये उच्चांक निर्मितीची सातत्य दर्शवितो जो सकारात्मक पूर्वाग्रह दर्शवितो. वरच्या बाजूला निर्देशांक २५४५०-२५५०० पातळींकडे चालू वरची हालचाल वाढवेल, जो सप्टेंबर २०२४ आणि जुलै २०२५ च्या प्रमुख उच्चांकांना जोडणारा ट्रेंडलाइन प्रति कार आहे. आम्ही Q2FY26 कमाई सत्रातून पुढे जात असताना स्टॉक विशिष्ट क्रिया फोकसमध्ये राहतील. तात्काळ आधार २५०००-२५१०० पातळीच्या आसपास आहे, जो मागील स्विंग कमी आणि २०-दिवसांच्या आणि ५०-दिवसांच्या EMA शी जुळतो. निर्देशां क याच पातळीच्या वर राहिल्यास अल्पकालीन बायस सकारात्मक राहील.

बँक निफ्टी आउटलुक

बँक निफ्टीने उच्च आणि उच्च पातळीच्या सकारात्मक गतीची सातत्य दर्शविणारी एक बुल कॅन्डल तयार केली. कमाईच्या सत्रातून पुढे जाताना स्टॉक विशिष्ट कृती लक्ष केंद्रित करेल. निर्देशांक ५७००० पातळीवर तात्काळ प्रतिकार करतो. या पातळीच्या वर गेल्या स ५७६०० पातळीच्या आसपासच्या सर्वकालीन उच्चांकाकडे आणखी वरची दिशा उघडेल. बँक निफ्टी बेंचमार्क निर्देशांकांपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. तात्काळ आधार ५६२००-५६००० पातळीवर आहे जो चालू आठवड्याचा नीचांक आहे. त्याच पातळी च्यावर राहिल्यास निर्देशांक तात्काळ बायस सकारात्मक राहतील.'

Comments
Add Comment