Wednesday, October 15, 2025

म.रे.च्या स्टेशन्सवर १६ ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद

म.रे.च्या स्टेशन्सवर १६ ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद
मुंबई (प्रतिनिधी): दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर १६ ते २८ ऑक्टोबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लो.टि.ट., ठाणे, कल्याण, पनवेल या स्टेशन्सवर ही बंदी असणार आहे. रेल्वे मंडळाच्या मार्गदर्शनानुसार, वरिष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, मुले आणि मदतीची आवश्यकता असलेल्या महिला प्रवाश्यांना प्लॅटफॉर्म तिकीट जारी केले नाईल, प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी प्रवासाचे त्यानुसार नियोजन करावे असे म.रे.तर्फे सांगण्यात आले आहे. डोंबिवली स्थानकात पुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी विशेष ब्लॉक मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकात १२ मीटर रुंद पादचारी पूलाच्या (एफओबी) गर्डर लॉचिंगसाठी अप आणि डाउन जलद मार्ग तसेच ५ वा आणि ६ वा मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक १५ व १६ ऑक्टोबर च्या रात्री ००.२० ते ३.२० वाजेपर्यंत ३ तास तर डाउन आणि अप जलद मार्गावर : १.२० ते ३.२० वाजेपर्यंत तास घेतला जाईल असे म.रे. कडून सांगण्यात आले आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा