Wednesday, October 15, 2025

दिवाळीपूर्वी दिल्लीत 'कृत्रिम पाऊस' पाडण्याची योजना

दिवाळीपूर्वी दिल्लीत 'कृत्रिम पाऊस' पाडण्याची योजना

दिल्लीच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी 'कृत्रिम पावसाचा' आधार!

नवी दिल्ली: दिवाळीच्या अवघ्या एका आठवड्यापूर्वी दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावत असल्याने, दिल्ली सरकारने प्रदूषित हवा स्वच्छ करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुरू केली आहे. पर्यावरण मंत्री मंजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले की, पुढील दोन ते तीन दिवसांत हवामानाची स्थिती अनुकूल झाल्यास, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मंजुरीनंतर तीन तासांच्या आत क्लाउड सीडिंग ऑपरेशन सुरू केले जाईल.

राजधानीत 'हवा गुणवत्ता निर्देशांक' (AQI) २०० चा टप्पा ओलांडल्यामुळे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनची (GRAP) पहिली पायरी आधीच लागू करण्यात आली आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या या योजनेत ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाईड सारखे पदार्थ टाकून पर्जन्याला प्रोत्साहन दिले जाते.

Comments
Add Comment