Wednesday, October 15, 2025

Midwest IPO Day 1: आज मिडवेस्ट आयपीओचे दमदार पदार्पण! पहिल्याच दिवशी १५.९६% प्रिमियम जीएमपीसह सबस्क्रिप्शन 'फूल'

Midwest IPO Day 1: आज मिडवेस्ट आयपीओचे दमदार पदार्पण! पहिल्याच दिवशी १५.९६% प्रिमियम जीएमपीसह सबस्क्रिप्शन 'फूल'

मोहित सोमण:आजपासून मिडवेस्ट लिमिटेड (Midwest Limited) कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल झाला होता. पहिल्या दिवशी कंपनीला एकूण १.२८ पटीने बिडिंग (बोली) मिळाले आहे. पहिल्याच दिवशी सबस्क्रिप्शन मोठ्या प्रमाणात मिळत पूर्णपणे आयपीओ सबस्क्राईब झाला आहे. ४५१ कोटी मूल्यांकन असलेल्या आयपीओला ३१.६६ लाख कोटींचे बिडिंग मिळाले होते ज्यामध्ये ३१.१७ लाख कोटी मूल्यांकनाचे शेअर विक्रीसाठी उपलब्ध होते. दुपारी २.५४ वाजेपर्यंत कंपनीच्या सबस्क्रिप्शनपैकी १.२२ पटीने सबस्क्रिप्शन किरकोळ गुंतवणूकदारांकडून (Retail Investors) मिळाले असून पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) ०.५१ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) २.४३ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (M arket Capitalisation) ३८५१.०२ कोटी रुपये आहे.

४५१ कोटींच्या बूक इश्यू असलेल्या आयपीओसाठी कंपनीकडून प्राईज बँड (Price Band) १०१४ ते १०६५ रूपये प्रति शेअर निश्चित केला आहे. १५ ते १७ ऑक्टोबरपर्यंत आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी बाजारात खुला आहे. साधारणतः २४ ऑक्टोबरला कंपनीचा शेअर बीएसई, एनएसईत सूचीबद्ध (Listed) होणार आहे. Dam Capital Advisors Limited कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Kfin Technologies Limited आयपीओची रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे.

४२३४७४० शेअरपैकी २३४७४१७ शेअरचा फ्रेश इशू असून उर्वरित शेअर ऑफर फॉर सेल होते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना १०१ रूपये प्रति शेअर सवलत आयपीओसाठी मिळेल असे कंपनीने म्हटले होते. कंपनीने कालच अँकर गुंतवणूकदारां कडून १३५ कोटी रु पयांच्या निधीची उभारणी केली होती. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी ४९.८८ वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, १९.९४% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, १४.९६% वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. १९८१ साली या कंप नीची स्थापना झाली होती.

नैसर्गिक दगडांचे अन्वेषण (Exploration), खाणकाम, प्रक्रिया, विपणन (Marketing),वितरण आणि निर्यात या व्यवसायात कंपनी कार्यरत आहे. कंपनी ब्लॅक गॅलेक्सी ग्रॅनाइटची उत्पादक आणि निर्यातदार आहे ही एक विशेष ग्रॅनाइट जाती आहे जी तिच्या चम कदार सोनेरी फ्लेक्ससाठी ओळखली जाते.मिडवेस्ट लिमिटेड तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील ६ ठिकाणी १६ ग्रॅनाइट खाणी चालवते, ज्यामध्ये ग्रॅनाइटच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन होते. कंपनीकडे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये एक ग्रॅनाइट प्रक्रि या सुविधा देखील आहे, ज्यामुळे ग्रॅनाइट उत्पादनांची मोठ्या प्रमाणात प्रक्रिया आणि फिनिशिंग शक्य होते. कार्यरत खाणींव्यतिरिक्त, मिडवेस्ट लिमिटेडने भविष्यातील खाणकामांसाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये २५ ठिकाणी एक मज बूत संसाधन आधार तयार केला आहे. तेलंगणा-आधारित मिडवेस्ट तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात १६ ग्रॅनाइट खाणी चालवते, ज्यामध्ये आंध्र प्रदेशातील एकाच गावात आढळणारे प्रीमियम ब्लॅक गॅलेक्सी आणि अ‍ॅब्सोल्यूट ब्लॅक ग्रॅनाइट तयार केले जाते जे दोन्ही जा गतिक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

आर्थिक वर्ष २०२५ साठी निव्वळ नफा १३३.५ कोटी रुपये होता, तर महसूल ६२६.२ कोटी रुपये होता. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७% अधिक महसूल मिळाला होता तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) ३३% वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requirements), भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure), प्री पेमेंट करण्यासाठी, व इतर दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशी कंपनीची जीएमपी (Grey Market Price)१७० रूपये सुरू आहे. म्हणजेच १५.९६% प्रिमियम दरासह कंपनीचा शेअर (मूळ किंमत १२३५+ जीएमपी १७०= १४०५ रूपये) प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.

Comments
Add Comment