
मोहित सोमण: एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स लिमिटेडने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. निकालातील माहितीनुसार, कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात (Consolidated Net Profit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३% वाढ झाली असल्या चे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी कंपनीला ४३५ कोटींचा एकत्रित नफा मिळाला होता तो यंदा वाढत ४४८ कोटींवर पोहोचला आहे. तसेच कंपनीच्या विमा प्रिमियममध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १५% वाढ झाली असून नव्या व्यवसा यात कंपनीने वाढ नोंदवली आहे.
गेल्या वर्षीच्या तिमाहीतील तुलनेत प्रिमियम उत्पन्न १५% वाढल्याने ३४१६२ कोटींवर पोहोचले. तसेच नव्या बिझनेस प्रिमियममध्ये १२% वाढ झाल्याने मागील वर्षाच्या तिमाहीतील १६२२२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १७९४० कोटींवर वाढ नोंदवली गेली. कंपनी च्या व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (Asset Under Management AUM) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ११% वाढ नोंदविण्यात आल्याने ३५९९९९ कोटींवरून वाढत ५ लाख कोटींवर उत्पन्न पोहोचले. व्यक्तिगत वार्षिक प्रिमियम (Individual Annualized Premium Equivalent APE) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १०% वाढ कंपनीने नोंदवली. गेल्या वर्षी ५८६४ कोटी प्रिमियम मिळाले होते ते या तिमाहीत वाढत ६४७१ कोटींवर पोहोचले आहे.
आगामी दुसऱ्या सहामाहीत वर्षात एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सने ७५० कोटी उभारण्याचे ठरवले आहे. सध्या कंपनीचा एकूण बाजारातील मार्केट शेअर ११.९% असून खाजगी वित्तीय समुह श्रेणीतील मार्केट शेअर १६.६% आहे.
निकालादरम्यान व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ विभा पडळकर म्हणाल्या की,'अलीकडील जीएसटी सुधारणा हा एक "रचनात्मक संरचनात्मक बदल होता ज्यामुळे अनुपालन सोपे झाले आणि परवडणारी क्षमता सुधारली. "उत्पादनांच्या किंमती आता अ धिक आकर्षक झाल्यामुळे, मध्यम ते दीर्घकालीन मागणीत वाढ होण्याची आम्हाला अपेक्षा आहे' असे त्या पुढे म्हणाल्या आहेत.
सत्र संपल्यानंतर कंपनीने तिमाही निकाल जाहीर केला होता. तत्पूर्वी आज बाजार बंद होताना एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सचा शेअर २.४५% उसळत ७६१.८० रूपये प्रति शेअरवर बंद झाला होता.