Wednesday, October 15, 2025

Gold Silver Rate: सोन्यात एकाच दिवसात प्रति तोळा १०९० रूपयांनी वाढ तर चांदी १९०००० पार

Gold Silver Rate: सोन्यात एकाच दिवसात प्रति तोळा १०९० रूपयांनी वाढ तर चांदी १९०००० पार

मोहित सोमण:आज अस्थिरतेचा दबाव सोन्याचांदीत प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे आजही सोन्याच्या व चांदीच्या दरात आणखी वाढ झाली असून सोने नव्या उच्चांकावर पोहोचले आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅ म दरात १०९ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०० रुपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८२ रूपये घसरण झाली. परिणामी सोन्याचे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२९४४ रूपये, २२ कॅरेटसाठी ११८६५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९७०८ रूपयांवर पोहोच ली आहे.संकेतस्थळावरील माहितीनुसार,प्रति तोळा किंमतीचा विचार केल्यास, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १०९० रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १००० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ८२० रूपयांनी वाढ झाली आ हे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२९४४० रूपये, २२ कॅरेटसाठी ११८६५० रूपये, १८ कॅरेट दर ९७०८० रूपयांवर पोहोचले आहेत. आज युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची आशा निर्माण झाली तरी सावधगिरी बाळगत मोठ्या प्रमा णात सोन्याच्या दरात रिव्हर्स गुंतवणूक गुंतवणूकदारांनी केली. यासह भारतीय बाजारपेठेत रूपयांच्या घसरणीसह जागतिक अस्थिरतेतील व दिवाळीपूर्वी वाढलेल्या स्पॉट मागणीमुळे सोने आणखी महागले. संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतात सोन्याचे सरा सरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२९४४ रूपये, २२ कॅरेटसाठी ११८६० रूपये, १८ कॅरेटसाठी ९८०० रूपयांवर गेले. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये सोन्याचा निर्देशांक संध्याकाळपर्यंत ०.४८% वाढत दरपातळी १२६८६७ रुपयांवर पोहोचली.

दुसरीकडे सकाळी इंडियन बुलियन अँड ज्वेलर्सने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेटचे दर ६४० रुपयांनी आज वाढत १२५७९२ रूपयांवर पोहोचले होते. उपलब्ध माहितीनुसार, या वर्षी आतापर्यंत एकूण सोन्याच्या सरासरी किमतीत ५०६३० रूपयांनी वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार, ३१ डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ७६१६२ होती, जी आता १२६७९२ वर पोहोचली आहे.गोल्डमन सॅक्सच्या अलीकडच्या अहवालानुसार, बँकेने पुढील वर्षीपर्यंत सोन्याचे प्रति औंस ५००० डॉलर्सचे लक्ष्य ठेवले आहे. जागतिक पातळीवरील सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.८६% वाढला आहे. जागतिक पातळीवरील मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत १.०१% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ४१८४.९० पातळी वर पोहोचली होती.

बुधवारी, सोन्याचा भाव पहिल्यांदाच $४,२००/औंसच्या वर गेला, कारण लवकरच अमेरिकेत व्याजदर कपात होण्याची अपेक्षा होती आणि अमेरिका-चीन व्यापार तणाव पुन्हा सुरू झाला होता. यामुळे सुरक्षित-निवासस्थानांच्या मागणीत भर पडली. सत्राच्या सुरुवा तीला $४,२००.११ या सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर, स्पॉट गोल्ड १.३% वाढून $४,१९७.०४ प्रति औंसवर व्यवहार करत होता. यूएस डिसेंबर गोल्ड फ्युचर्स १.२% वाढून $४,२१३.५४/औंसवर पोहोचला. काल उशीरा फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी गुंत वणूकदारांनी 'डॉविश' म्हणून अर्थ लावल्यानंतर मौल्यवान धातूच्या वाढीला वेग आला. पॉवेल म्हणाले की अमेरिकन अर्थव्यवस्था काही अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत मार्गावर असू शकते, परंतु त्यांनी इशारा दिला की एक लक्षणीय कमकुवत कामगार बाजार उदयास येत आहे. त्यांनी असेही म्हटले की धोरणासाठी कोणताही धोकामुक्त मार्ग नाही आणि भविष्यातील निर्णय बैठकांद्वारे घेतले जातील. त्यामुळे दरकपातीत आशावाद असला तरी अनिश्चितता कायम आहे. याच आधारे दरपातळी सातत्याने वाढत आहे.

जेरोमी पॉवेल यांच्या वक्तव्यामुळे ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये फेडच्या संभाव्य दर कपातीच्या बाजारातील अपेक्षांना बळकटी मिळाली, ज्यामुळे अमेरिकन ट्रेझरी उत्पन्न कमी झाले आणि डॉलर कमकुवत झाला होता. अमेरिका आणि चीनमधील नवीन व्यापार तणावामुळे तेजीच्या गतीत भर पडली. अमेरिकेतील सोयाबीन खरेदीवर बीजिंगने माघार घेतल्याच्या प्रतिसादात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनशी काही व्यापार संबंध संपुष्टात आणण्याची कल्पना मांडली. आज विशेषतः स्वयंपाकाच्या तेलाच्या आयातीला लक्ष्य केले.

चांदीच्या दरातही वाढ कायम !

सोन्याबरोबरच आज अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर चांदीत वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १ रुपयाने तर प्रति किलो दरात १९०० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १९० प्रति किलो दर १९०००० रू पयांवर गेला आहे. भारतीय एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.०९% वाढ झाल्याने दरपातळी १६१२४३ रूपयांवर गेली. जागतिक पातळीवरील चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात १.५५% वाढ झाली आहे. आज रूपयात झालेल्या घसरणी सह जागतिक अस्थिरतेत चांदीच्या दरातही फटका बसला. तसेच वाढलेल्या स्पॉट मागणीसह मोठ्या प्रमाणात वाढलेल्या औद्योगिक मागणीमुळे चांदीही महागली आहे.

काल चांदीच्या निर्देशांकात जागतिक पातळीवर ३.१४% वाढला होता. जागतिक तज्ञांच्या मते, ज्यामुळे लंडनच्या बाजारपेठेत ऐतिहासिक शॉर्ट क्विझ आणि कमी लिक्विडिटीमुळे व्यापाऱ्यांना जगभरात भौतिक पुरवठ्यासाठी धाव घ्यावी लागली. लंडनमधील भाडेप ट्ट्याचे दर ३०% पेक्षा जास्त वाढले आहे .ज्यामुळे शॉर्ट पोझिशन्स राखणे महाग झाले.

Comments
Add Comment